शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात १४ दिवसात वाढले १४ टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:32 IST

निवडणूक, सुट्यांमुळे योजनांचे काम रखडले

जळगाव : यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्हाभरात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होतांनाचे चित्र आहे़ गेल्या दोन आठवड्यात जिल्हाभरात टँकरची संख्या १४ ने वाढली आहे़ सध्या जिल्ह्यात १४७ गावांमध्ये १३४ टँकर सुरू आहेत़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातून ही माहिती मिळाली़ आठवड्याला सरासरी पाच टँकर वाढत असल्याचे चित्र आहे़ त्यातच निवडणुका व सलगच्या सुट्या यामुळे दररोज अपडेट होणारी ही आकडेवारीही खोळंबली आहे़ आचारसंहितेमुळे योजना रखडल्या असल्याने टंचाईने अनेक गावांची होरपळ होत आहे़महत्त्वाच्या विभागात शूकशुकाटपाणीटंचाईच्या काळात पाणीपुरवठा व लघूसिंचन या विभागाकडे महत्त््वाच्या जबाबदाऱ्या असतात़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभागात रंगरंगोटीचे काम सुरू आहे़ शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास या विभागात सात कर्मचारी उपस्थित होते़ तर कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात स्वच्छतेचे काम सुरू होते़ याव्यतिरिक्त लघूसिंचनच्या कार्यालयात शूकशुकाट होता़ दोन दिवस सुट्या त्यात निवडणुकीच्या ड्युट्या या सर्वांमुळे जिल्हाभरातील टँकरची आकडेवारी अपडेट करण्याचे काम रखडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले़ तालुकास्तरावरून आढावा घेऊन किती गावांमध्ये किती टँकर सुरू आहे, याची आकडेवारी या विभागाकडून घेतली जाते़ मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत या टँकरची सध्यास्थिती काय याकडे मात्र, दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे़जिल्हा परिषदेत आता विरोधकच नाहीजिल्हाभरात पाण्याचा विषय अतिशय गंभीर असताना राजकीय पदाधिकारीही याबाबतीत पाहिजे तेवढे गंभीर नसल्याचे चित्र आहे़ आचारसंहिता लागताच उमेदवार घोषित होताच पदाधिकारी प्रचारात गुंतले़ जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसच्या सहकार्याने भाजपची सत्ता आहे़ शिवसेना विरोधात आहे, मात्र, लोकसभा निवडणुकीत युतीची घोषणा झाली व शिवसेनेला जिपच्या सत्तेत वाटा मिळेल अशी, आशा निर्माण झाली़ समाननिधी असो किंवा सभा तहकूब होण्याचा विषय असो आक्रमक भूमिका मांडणाºया शिवसेनेनेही आता भाजपची बाजू सावरण्यास सुरूवात केली असल्याने जि.प.त विरोधक नसल्यामुळेही पाणीटंचाई सारख्या अत्यावश्यक विषयावर आक्रमक भूमिका मांडायला कुणीही तयार नाही, अशी स्थिती आहे.गेल्या आठवडाभरात ९ टँकर वाढले होते़ त्यानंतर ११ एप्रिलच्या आकडेवारीनुसार १४३ गावांमध्ये १२९ टँकर सुरू होते़ १५ एप्रिल चार गावांमध्ये चार टँकर वाढले़ ही संख्या अजून वाढण्याचाी शक्यता आहे़निवडणूक ड्युटीविषयी गूढजिल्हा परिषदेतील साधारण ७० टक्के कर्मचाºयांची निवडणूक काळात ड्युटी लावण्यात आलेली आहे़ सामान्य प्रशासन विभागातील 90 टक्के कर्मचारी यात व्यस्त आहेत़ यात अधिकाºयांपासून शिपायांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे़ दरम्यान, निवडणूकीमुळे जिल्हाभरातील पाणीटंचाईचा विषय दुर्लक्षित होत असल्याची ओरड होत असताना पाणीपुरवठा विभागातील नेमक्या किती कर्मचाºयांना निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे याबाबत कर्मचाºयांमध्ये संस्पेन्स आहे़ प्रशिक्षण सर्वांनीच घेतले आहे, मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचीही आॅर्डर निघू शकते, अशी माहिती मिळाली़आचारसंहितेमुळे नव्या योजना मंजूर न करण्याच्या व मंजूर योजनांचे इ टेंडरिंग न करण्याच्या सूचना आहेत़ त्यामुळे विहिरी अधिग्रहन व विहिर खोलीकरणावरच आपला भर आहे़ मंजूर कामांपैकी अधिकांश कामे झालेली आहेत़आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ - एस़ बी़ नरवाडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Jalgaonजळगाव