शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्हा रुग्णालय बनले निराधार महिलेचे आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 12:29 IST

मायेची ऊब : दोन महिन्यांपासून संभाळ करीत असलेल्या महिलेला पूत्ररत्न

ठळक मुद्देपूत्ररत्न झाल्याने आनंद परिचारिका, कर्मचारी यांनी केले सहकार्य बाळ व बाळंतीनची प्रकृती उत्तम

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 2 - भुसावळ येथे सापडलेल्या निराधार गर्भवती महिलेचा गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयाच्यावतीने संभाळ करण्यात येऊन तिला मायेची ऊब दिली. कोणीही नातेवाईक न आलेल्या या महिलेला पूत्ररत्न झाल्याने येथील कर्मचा:यांनी आनंद व्यक्त केला. भुसावळ येथे मंद बुद्धी असलेली एक 40 वर्षीय  गर्भवती महिला बेवारस अवस्थेत आढळून आली होती. त्या वेळी तिला तेथील महिला दक्षता समितीच्यावतीने 6 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा पासून ही महिला जिल्हा रुग्णालयातच होती.मध्यंतरी या महिलेने जिल्हा रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिची वेळीच अधिकारी, कर्मचा:यांनी लक्ष देऊन तिला न जाऊ देता, तिचा कोणताही कंटाळा न करता तिचा व्यवस्थित संभाळ केला. त्यानंतर तिला येथे मायेची ऊब मिळाल्याने तिचेही येथे मन रमले. 

31 ऑगस्ट रोजी त्या महिलेला मुलगा झाला.  अडीच किलो वजनाच्या या बाळ व बाळंतीनची प्रकृती उत्तम आहे. आपल्या संभाळामुळे एक बेवारस महिला सुखरुपरित्या प्रसूत झाल्याने त्याचे मोठे समाधान व आनंद असल्याचे येथील कर्मचा:यांनी सांगितले. या महिलेच्या काळजी व प्रसूतीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता भोळे, डॉ. रेणुका भंगाळे, डॉ. कैलास पाटील, डॉ. संदीप पाटील, प्रसूती कक्षाच्या प्रमुख विमल चौधरी, लता देशमुख  तसेच प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात कक्षातील परिचारिका, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यासाठी प्रमोद झवर यांनी वेळोवेळी या महिलेला आवश्यक मदत केली. 

जिल्हा रुग्णालयात येणा:या प्रत्येक रुग्णांची आम्ही संपूर्ण काळजी घेत असतो. त्यात ही महिला बेवारस असल्याने सर्व अधिकारी, कर्मचा:यांनी तिची विशेष काळजी घेतली. - डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक.