शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात लोक न्यायालयात साडे तीन हजार खटले निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 22:59 IST

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्टÑीय लोक न्यायालयात शनिवारी ३ हजार ७७३ खटले निकाली काढण्यात आले. त्यात ९ कोटी ६ लाख ४० हजार ६७२ रुपयांची तडजोड झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालयात या लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत लोकअदालतचे कामकाज सुरु होते. 

ठळक मुद्दे९ कोटी रुपयांची तडजोड  १५ पॅनलमध्ये चालले कामकाजसकाळी १० ते रात्री ८ पर्यंत चालले कामकाज

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,९: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या  लोक न्यायालयात शनिवारी ३ हजार ७७३ खटले निकाली काढण्यात आले. त्यात ९ कोटी ६ लाख ४० हजार ६७२ रुपयांची तडजोड झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा न्यायालयात या  लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १० वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत लोकअदालतचे कामकाज सुरु होते. या न्यायालयासाठी १५ पॅनल नियुक्त करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलमध्ये एक न्यायाधीश, दोन सदस्य वकील होते. जळगाव तालुका व मुख्यालयातील दिवाणी व फौजदारी खटले, कलम १३८ एन.आय अ‍ॅक्ट प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, दरखास्ती, बॅँक, विमा कंपन्या, विद्युत कंपनी, भूसंपादन, न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरणे, दावे तसेच औद्योगिक न्यायालय, कामगार, सहकार न्यायालयाचीही प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली.

पक्षकार, त्यांचे नातेवाईक वकील यांच्यामुळे न्यायालयाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. ही गर्दी पाहता न्यायालयात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सरकारला व्याजात १५ टक्के सूटभूसंपादनाच्या प्रकरणात शेतक-यांनी दरखास्तीमध्ये दोन वर्षाचे १५ टक्के वार्षिक दराने व्याजाची सुट सरकारला दिलेली आहे. याशिवाय प्रलंबित भूसंपादन प्रकरणात तडजोड केल्यामुळे एक वर्षाची व्याजाची सुटही सरकारला मिळालेली आहे. अशा प्रकरणात ३ कोटी ५० लाख ८७ हजार १६५ रकमेची तडजोड झालेली आहे. यात शासनाने आव्हान न देता येणारा निकाल हा पक्षकारासाठी फायद्याचा ठरला आहे. भूसंपादन प्रकरणात अधिकारी व वकीलांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने ४१३ पेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहेत.या लोकन्यायालयाला जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.महाजन, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, प्रांताधिकारी जलज शर्मा उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी म्हणून उपअधीक्षक सचिन सांगळे व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे उपस्थित होते.