शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात जिल्हा बॅँक उपाध्यक्षांनी वाजविला बॅँकेसमोर ढोल

By admin | Updated: July 10, 2017 17:32 IST

कर्जमाफीच्या याद्या जाहीर करण्याची शिवसेनेची मागणी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.10 -राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा करून देखील अद्याप लाभार्थी शेतक:यांच्या याद्या बॅँकांकडून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्या तत्क ाळ जाहीर कराव्यात तसेच शेतक:यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हा बँकेसमोर सोमवारी दुपारी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. खुद्द जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनीही जिल्हा बॅँकेसमोर ढोल वाजवून आंदोलन केले. 
यावेळी शिवसेनेचे चोपडय़ाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर.ओ.पाटील, माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा,  माजी जि.प.सदस्या इंदिराताई पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील,  जिल्हा संघटक हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,  जि.प.सदस्य गोपाल पाटील, प्रताप पाटील,  बाजार समितीचे संचालक कैलास चौधरी, लकी टेलर, शेतकी संघाचे संचालक रामचंद्र पाटील, महानगरप्रमुख कुलभुषण पाटील, गणेश सोनवणे यांच्यासह शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 
राज्य शासनाकडून शेतक:यांची फसवणूक
ढोल वाजविल्यानंतर जिल्हा बॅँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले. शेतक:यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतक:यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणांनी शिवसैनिकांनी जिल्हा बॅँक परिसर दणाणून सोडला. राज्यशासनाकडून कर्जमाफीची घोषणा करून 25 दिवस उलटल्यानंतरही अद्याप शेतक:यांचा याद्या जाहीर केल्या नसल्याने राज्यशासनाकडून शेतक:यांची फसवणूक झाली असल्याचा आरोप माजी आमदार आर.ओ. पाटील यांनी केला. 
शासनाने खूप अभ्यास केल्यानंतरही ‘ढ’च- किशोर पाटील
 शासनाकडून मोठा अभ्यास केल्यानंतर कर्जमाफी जाहीर केली. मात्र या निर्णयापासून बहुसंख्य शेतकरी वंचित राहिले आहेत. या निर्णयामुळे मोठय़ा अभ्यासानंतर विद्यार्थी ‘ढ’ च राहिला असल्याचा टोमणा आमदार किशोर पाटील यांनी हाणला.