शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पेट्रोल-डिझेलची मागणी २५ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणारे दर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे प्रवासावर बंधने आल्याने पेट्रोल-डिझेलची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणारे दर तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे प्रवासावर बंधने आल्याने पेट्रोल-डिझेलची मागणी सरासरी २५ टक्क्यांनी घटली आहे. जानेवारी ते मे २०२१ यादरम्यानची मागणी पाहता निर्बंध लागू झाल्यानंतर ती कमी-कमी होत गेली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हापासून वाहनाने बाहेर फिरायला जाणे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर देखील बंधने आल्याने इंधनाची मागणी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात आणखी भर म्हणजे पेट्रोल-डिझेलचे वाढत जाणारे दर यामुळे देखील वाहनधारक वाहनांचा कमीत कमी वापर करीत बचत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे इंधनाची मागणी सरासरी २५ टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे.

जानेवारीमध्ये एका दिवसात २६०० ते २७०० लिटर पेट्रोलञी विक्री झाली, हे प्रमाण कमी होत जाऊन मे महिन्यामध्ये एका दिवसात २००० ते २१०० लिटरच्या जवळपास आले आहे. अशाच प्रकारे जानेवारी महिन्यात एका दिवसात १४०० ते १५०० लिटर डिझेलची विक्री होत होती, ती आता मे महिन्यामध्ये एका दिवसात ९०० ते १००० लिटरवर आली आहे.

सोमवारी पेट्रोलचे भाव १०१.६९ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.२० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. ही भाववाढ पाहता पेट्रोल, डिझेलची मागणी काहीशी कमी होत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधांमुळे विक्रीवर अधिक परिणाम झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गेल्या पाच महिन्यांतील पेट्रोल, डिझेलची विक्री पाहता त्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. इंधनाचे वाढत जाणारे भाव तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध यामुळे मागणी घटली आहे.

- लक्ष्मीकांत चौधरी, पेट्रोल पंपचालक

कोरोनामुळे एकतर बाहेर फिरणे कमी झाले असून, त्यामुळे पेट्रोल कमी लागत आहे. तसेच भाव दिवसेंदिवस वाढत असून, आता तर पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. वाहन वापरण्यापेक्षा जी कामे पायी जाऊन होणार आहेत ती पायी जाऊनच करीत असून, वाहनाचा कमीत कमी वापर केला जात आहे.

- राजेश महाजन, वाहनचालक.