शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जळगावात दस:याच्या मुहूर्तावर 150 घरांचे बुकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:49 IST

600 किलो श्रीखंड होणार फस्त

ठळक मुद्देश्रीखंडाला तीनपटीने वाढली मागणीङोंडू फुलाच्या बाजारात तेजीबाजारात खरेदीसाठी गर्दी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 29 - नवरात्रोत्सव व विजयादशमीच्या पाश्र्वभूमीवर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून घरांच्या खरेदीमध्येही उत्साह दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर तब्बल 10 महिन्यांनी या क्षेत्रात प्रेरक वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली असून विजयादशमीसाठी दीडशेवर घरांचे बुकिंग झाले आहे. या सोबतच बाजारपेठेत गोडधोड पदार्थाना मागणी वाढली असून दस:याच्या  दिवशी जवळपास 600 किलो श्रीखंड फस्त होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ङोंडूच्या बाजारातही मोठी आवक वाढली असून खरेदीसाठी उत्साह आहे. 

दहा महिन्यांनंतर उत्साहाचे वातावरणगेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीच्या निर्णयानंतर रियल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी पसरली व या क्षेत्रात कधी नव्हे एवढे चिंतेचे वातावरण पसरले. हातचा पैसा गेल्याने यातील गुंतवणूक थांबली व बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले. मात्र आता 10 महिन्यांनंतर आता पुन्हा यामध्ये घर खरेदीला सुरुवात झाली असून साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीसाठी जळगावात दीडशेवर घरांचे बुकिंग झालेले आहे. 

व्याजदर कमी झाल्याचा फायदासध्या बँकाचे गृहकर्जासाठीचे व्याजदरही कमी आहे. त्याचाही फायदा घेतला जात असून सामान्यांच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

विजयादशमीला श्रीखंडाला मोठी मागणी असते. त्यानुसार जळगावातही ही मागणी वाढली असून यंदा  नेहमीपेक्षा तीनपट श्रीखंड विजयादशमीच्या दिवशी विक्री होत हा खप जवळपास 600 किलोवर जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाभरात जळगाव शहरातील श्रीखंडाला मागणी असते. 

नवनवीन फ्लेवरसध्या श्रीखंडमध्ये पाच वेगवगेळे फ्लेवर उपलब्ध करून देण्यात आले असून यामध्ये राजभोग, ड्रायफ्रूट, अंजीर काजू, फ्रेश फ्रूट, आम्रखंड या फ्लेवरला पसंती दिली जात आहे. या सोबतच बासुंदीलादेखील मागणी असून तिचीही जोरात विक्री होण्याचा अंदाज आहे. 

ङोंडूच्या फुलांची मोठी आवक वाढली असून शुक्रवारी कलकत्ता ङोंडूचे  किरकोळ भाव 110 ते 125 रुपयांवर पोहचले होते. इतर प्रकार 50 ते 60 रुपये किलोवर होते. यामध्ये विजयादशमीला आवक वाढली तर भाव कमी होण्याची शक्यता आहे. 

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी झालेली होती. खाद्यपदार्थासह गृहसजावट, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहने, कपडे इत्यादी वस्तूंच्या खरेदीची लगबग दिसून आली. 

घर खरेदीसाठी सकारात्मक वातावरण तयार होत असून विजयादशमीसाठी बुकिंगही केले जात आहे. या क्षेत्रात पूर्वस्थिती येत आहे. - विनय पारख, संचालक, पीपीआरएल. 

विजयादशमीसाठी श्रीखंडाला मागणी असते. यंदाही या दिवशी चांगली विक्री होण्याचा अंदाज असून  जिल्हाभरातील नागरिकांकडून श्रीखंडाला पसंती असते. - मुकेश टेकवाणी, संचालक, सरस्वती डेअरी.