शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात फटाक्यांची उलाढाल निम्म्यावर, फटाकेमुक्त दिवाळी संकल्पाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:24 IST

तीन हजार कोटींवरून दीड हजार कोटींवर घसरण

ठळक मुद्देविक्रेते हवालदिलसरकारच्या निर्णयाचा परिणाम

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22- फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प व सरकारच्या निर्णयामुळे यंदा दिवाळीमध्ये फटाक्यांची उलाढाल निम्म्यावर आली आहे. जळगावात दरवर्षी दिवाळीमध्ये साधारण तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. यंदा ही उलाढाल थेट दीड ते दोन कोटींवर आली आहे. यामुळे व्यावसायिक चिंतीत असून या बाबत सकारात्मक विचार होणे गरजेचे असल्याचा सूर उमटत आहे. दिवाळी म्हटले म्हणजे फटाक्यांची जोरदार आतशबाजी हे शेकडो वर्षाचे गणित आहे. मात्र हल्ली फटाक्यांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे सांगून प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आल्याने त्याचा यंदा मोठा परिणाम दिसून आला. सरकारच्या निर्णयाचा परिणामदिवाळीसाठी फटाके निर्मिती, विक्रीची तयारी झालेली असताना दिवाळीच्या आठवडाभर अगोदर सरकारने 9 ऑक्टोबर रोजी निवासी परिसरात फटाके विक्रीस बंदी घातल्याचा निर्णय घेतला. जळगावात अशी परिस्थिती नसली तरी यातून छोटय़ा छोटय़ा विक्रेत्यांनी धास्ती घेतली. परिणामी होलसेल विक्री होणा:या मालावर परिणाम झाला. फटाके मुक्तीचा संकल्पविविध सामाजिक संस्थांनी फटाके न फोडण्याचे आवाहन केल्याने अनेक जण फटाक्यांपासून लांब राहिले. या सोबतच शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ विद्याथ्र्याना देण्यात आली. त्यामुळे लहान मुलांचे जेवढे प्रमाण फटाके फोडण्यात असते, त्यात मोठी यंदा घट झाली. विक्रेते हवालदिलफटाक्यांचा व्यवसाय करण्यासाठी संबंधित व्यावसायिक एकूण 9 ठिकाणाहून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासह वेगवेगळ्य़ा पूर्तता कराव्या लागतात. यामुळे यासाठी वर्षभरापूर्वीपासूनच तयारीला लागावे लागते. एवढे करून दिवाळीच्या आठवडाभरापूर्वी  सरकारच्या निर्णयाने विक्रेत्यांना वेठीस धरल्याचे सांगितले जात आहे. प्रदूषण केवळ 0.4 टक्केदिवाळीमध्ये फटाके फोडल्याने प्रदूषण वाढते, असे सांगून फटाके फोडण्यावर बंदीचे आवाहन केले जाते. मात्र प्रत्यक्षात वाहनांच्या व वर्षभरातील इतर प्रदूषणाच्या प्रमाणात दिवाळीत होणा:या प्रदूषणाचे प्रमाण केवळ 0.4 टक्केच असल्याचा दावा फटाका विक्रेत्यांचा आहे. 

यंदा प्रदूषणमुक्तीबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाल्याने नागरिकांनी फटाक्यांची खरेदी कमी केली. त्यामुळे उलाढाल निम्म्यावर आली असून होलसेल विक्रेत्यांकडे माल पडून आहे. पुढील वर्षी मालाचे प्रमाण कमी करण्याचा अंदाज आहे. - युसुफ मकरा, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ तथा फटाके व्यावसायिक

दिवसेंदिवस फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात असल्याने फटाके विक्रीचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे यंदा फटाक्यांची उलाढाल निम्म्यावर आली आहे. - हरीश मिलवाणी, फटाके व्यावसायिक.