शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील महाविद्यालयात विद्यार्थी संघटनांना दुर करुन अपक्षांनी मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:56 IST

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विद्यार्थी संघटनांना दुर सारुन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली.

ठळक मुद्दे विद्यार्थी परिषद सचिव निवडणूकयुवासेनेचा ३ तर अभाविपचा एका जागेवर दावाआठ महाविद्यालयांमध्ये झाली बिनविरोध निवड

आॅनलाईन लोकमत,

जळगाव,दि.६-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विद्यार्थी संघटनांना दुर सारुन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. ३ महाविद्यालयांमध्ये युवासेनेने तर एका महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विजयमिळविल्याचा दावा केला आहे. तर उर्वरीत महाविद्यालयांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने विद्यार्थी संघटनांना जोरदार धक्का बसला आहे.  

यंदा नवीन विद्यापीठ कायद्यामुळे खुल्या विद्यार्थी निवडणुका होतील अशी अपेक्षा असताना, शैक्षणिक वर्ष संपत आल्यावर देखील शासनाला खुल्या निवडणुकांचे परिनियम तयार करता आले नाही. त्यामुळे शुक्रवारी जुन्याच कायद्याप्रमाणे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका उमवि अंतर्गत येणाºया सर्व महाविद्यालयांमध्ये घेण्यात आल्या. शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये या निवडणुका शांततेत पार पडल्या.    चार महाविद्यालयांमध्ये झाली निवडणूक शहरातील एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, उमवि विभाग, मू.जे.महाविद्यालय व डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या सचिवपदाची निवड ही मतदानाने करण्यात आली. तर रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट कॉलेज, नूूतन मराठा महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय, शिरीष चौधरी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी, आय.एम.कॉलेज व मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या सचिवांची बिनविरोध निवड करण्यात आली.    

 अभाविपला बसला धक्का  महाविद्यालयांमध्ये झालेल्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला असून, शहरातील केवळ मू.जे.महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उमेदवार विजयी झाला आहे. तर उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व बाहेती महाविद्यालयात युवासेनेने बाजी मारली असल्याचा दावा युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश ठाकुर यांनी केला आहे. तर राष्टÑीय युवक कॉँग्रेससह युवक राष्टÑवादी संघटनेला एकाही महाविद्यालयात बाजी मारता आली नसल्याचे या निवडणुकीत दिसून आले.  

   ८ तारखेपर्यंत पाठवावी सचिवांची यादी महाविद्यालयांमध्ये झालेल्या निवडणुकानंतर विजयी झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या सचिवांची नावे सर्व महाविद्यालयांना सोमवारपर्यंत विद्यापीठाकडे पाठवावी लागणार आहेत. त्यानंतर १५ ते २० विद्यार्थ्यांची नावे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी नियुक्त करणार आहेत. त्यानंतर १२ जानेवारीपर्यंत विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.    

 अपक्षांना वळविण्यासाठी धडपड  अपक्ष उमेदवारांनी मिळविलेल्या विजयानंतर त्यांनी आपल्या संघटनेला पाठींबा द्यावा यासाठी विद्यार्थी संघटनांमध्ये चढाओढ दिसून आली. निवडणुकानंतर विजयी झालेल्या विध्यार्थ्याची भेट घेवून, त्यांचा सत्कार विद्यार्थी संघटनांच्यावतीने करण्यात आला. मात्र अनेक महाविद्यालयांमधील अपक्ष निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांची ‘आॅफर’ स्पष्टपणे नकार दिल्याचे चित्र दिसून आले.  

  समाजकार्य महाविद्यालयात निवडणूक परत घ्या शहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात सुवर्णा दळवी हिच्या विरोधात उमेश राठोड या विद्यार्थ्याने केलेला उमेदवारी अर्ज छाननीनंतर बाद झाल्याने सुवर्णा दळवीची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर उमेश राठोड याने ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगून उमविचे कुलसचिव बी.बी.पाटील यांच्याकडे निवडणूक नवीन घेण्याची मागणी केली आहे. १२ पैकी ७ वर्ग प्रतिनिधी आपल्याच बाजुने असल्याचा दावा देखील उमेश राठोड याने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.