शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 22:27 IST

शहरात लग्नाला येत असताना महामार्गावरील मानराज पार्कजवळ पारोळ्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनावर चालकाच्या दिशेने रविवारी दुपारी साडे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फायटरने हल्ला केला. या हल्लयात कोणालाही दुखापत झाली नसली तरी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

ठळक मुद्दे चालकाच्या दिशेने झाला हल्लाकारमध्ये आमदार, अंगरक्षक, स्वीय सहायक  पोलिसात तक्रार दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २५ :  शहरात लग्नाला येत असताना  महामार्गावरील मानराज पार्कजवळ पारोळ्याचे राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वाहनावर चालकाच्या दिशेने रविवारी दुपारी साडे तीन वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी फायटरने हल्ला केला. या हल्लयात कोणालाही दुखापत झाली नसली तरी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आमदार डॉ.सतीश पाटील हे कारने (क्र.एम.एच.१५ इ.एक्स ९००९) रविवारी दुपारी जळगाव शहरात लग्नाला येत होते. चालक गुलाब पाटील यांच्या बाजूलाच डॉ.पाटील बसले होते तर मागील सीटवर अंगरक्षक कोकणे व स्वीय सहायक भैय्या माणिक पाटील हे बसले होते. दुपारी साडे तीन वाजता महामार्गावर मानराज पार्क ओलांडल्यानंतर रेल्वे उड्डापुलाजवळ दुचाकीवरुन समोरुन दोन जण आले. त्यापैकी दुचाकी चालविणाºयाने हात बाहेर काढला असल्याने कार चालकाने त्याला धक्का लागू नये म्हणून कार थोडी बाजूला घेतली, याचवेळी दुचाकीस्वाराने चालकाच्या दिशेने फायटरने जोरदार हल्ला केला.

हल्लयानंतर ठोकली धूमहल्लेखोर तरुणाने हेल्मेट परिधान केले होते तर मागे बसलेल्याने चेहरा लपविला होता. कारमध्ये पोलीस दिसताच हल्लेखोरांनी तेथून धूम ठोकली. या घटनेत चालकाच्या अंगावर काच पडली, सुदैवाने कुठेही दुखापत झाली नाही. चालकाचे नियंत्रण सुटले असते तर कार थेट रस्त्याच्या खाली कोसळली असती. घटनास्थळ अपघातक्षेत्र आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.पोलीस अधीक्षकांना दिली माहितीघटना घडल्यानंतर आमदार पाटील हे जळगाव शहरातील काम आटोपून पारोळा येथे गेले. तेथून पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना भ्रमणध्वनीवरुन घटनेची माहिती दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा शोध घेण्याचे आश्वासन कराळे यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पारोळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून ती शून्य क्रमांकाने जिल्हा पेठ पोलिसात वर्ग होणार आहे.