शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

विमानसेवेचे स्वप्न होणार पूर्ण, जळगावकर 90 मिनिटात पोहोचणार मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 12:29 IST

एअर डेक्कनकडून 19 आसनी विमान येणार

ठळक मुद्देआजपासून तिकिट विक्री1700 मीटर लांब धावपट्टी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 14-  तब्बल सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर जळगाव ते मुंबई या एअर डेक्कनच्या विमान सेवेला येत्या 23 डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे.  आठवडय़ातील मंगळवार ते रविवार असे सहा दिवस ही सेवा असेल. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘उडान’ योजनेत नवे 45 विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचा समावेश असून जळगाव येथेही विमानसेवा प्रस्तावित करण्यात आली आहे. या सेवेमुळे  जळगाव ते मुंबईचे अंतर केवळ 90 मिनिटात  पूर्ण करता येईल. उद्योजक, व्यापारी, अधिकारी तसेच नागरिकांसाठी ही सेवा मोठी उपलब्धी ठरणार आहे. एअर डेक्कनच्या वेबसाईटवर तिकीट मिळणार आहे.सात वर्षापासून प्रतिक्षा2010 मध्ये जळगाव विमानतळ पूर्ण होऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून विमानसेवेबाबत प्रतिक्षा होती. यासेवेसाठी  प्रथम 15 सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र हा मुहूर्तही टळला होता. अशा आहेत विमान तळावर सुविधा कुसुंबा गावाजवळ 303 हेक्टर जमिनीवर हे विमानतळ उभारण्यात आले आहे.  या ठिकाणी  प्रवासी टर्मिनल पूर्ण झाले आहे.     त्यात टर्मिनलची विद्युत उपकरणे ही सौर ऊज्रेवर चालणार आहेत.    प्रवासी टर्मिनलमध्ये अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी दोन कक्ष, प्रवाशांसाठी मोठे प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणी केंद्र  आहे. विमानतळासाठी स्वतंत्र वीज फिडर बसविण्यात आले आहे.  विमानतळावरून प्रति उड्डाणासाठी करावे लागणारे संदेश दळणवळण, त्यासाठी लागणारी अद्ययावत संदेशवहन यंत्रणा,  प्रकाश व्यवस्था, हवामानाची अचूकस्थिती कळविणारी अद्ययावत यंत्रणा, हवाई मार्ग उपलब्धतेबाबत होणारे संदेश वहन यंत्रणांची उभारणीही या ठिकाणी झाली आहे. जिल्हाधिका:यांकडे आढावाविमान तळ विकास प्राधिकरणाचे स्थानिक महाव्यवस्थापक विजय चंद्रा व अन्य अधिका:यांनी बुधवारी सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांची भेट घेतली.  जिल्हाधिका:यांनीही या वृत्तास दुजोरा दिला. अशा असतील वेळामुंबईहून सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी हे विमान निघून जळगावी 9 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल.   दर  मंगळवार, बुधवार, रविवार असे तीन दिवस जळगाव येथून  11 वाजून 15 मिनिटांनी उडून मुंबई येथे दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल. तर दर गुरूवार, शुक्रवार, शनिवार असे तीन दिवस जळगाव येथून दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी निघून मुंबई येथे 4 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. विविध ठिकाणी सुविधा23 पासून सुरू होणा-या एअर डेक्कनच्या या सुविधेत मुंबई-नाशिक, नाशिक-पुणे, मुंबई - जळगाव असे विमान सेवेचे नियोजन करण्यात आले आहे.1700 मीटर लांब धावपट्टीसध्या असलेली 1700 मीटर लांब व 45 मीटर रुंदीची धावपट्टी येथे तयार असून प्रतिसाद मिळू लागल्यावर भविष्यात धावपट्टी  विस्तारित करण्याचाही प्रस्ताव होता. हे काम झाल्यावर जळगावला बोईंग विमानदेखील उतरू शकेल असे नियोजन होते. विमान उतरल्यानंतर ते अॅप्रनवर येईल. तिथून प्रवाशांना टर्मिनलर्पयत आणण्यासाठी चारचाकी वाहने ठेवण्यात येतील त्या दृष्टीनेही कामे झालेली आहेत. विमान तळावरील झालेल्या या तयारीची केंद्राच्या उडान योजनेंतर्गत नियुक्त अधिका:यांच्या समितीने गेल्या वर्षीच पाहणी केली होती. जळगावच्या विमानतळावर एअर डेक्कनचे 19 आसनी विमान मंगळवार ते रविवार असे सहा दिवस सेवा देईल. सुरूवातीच्या कालखंडात या सेवेला प्रतिसाद लाभावा म्हणून प्रति व्यक्ती 1420 रूपये भाडे असेल. मुंबई ते जळगाव व पुन्हा परतीचा प्रवास असे या विमान सेवेचे नियोजन आहे. 

एअर डेक्कन कंपनीचे हे विमान बी 1900 डी प्रकारचे एअरक्रॉप्ट असून त्याची प्रवासी क्षमता 19 इतकी आहे. तीन वर्षापासून पाठपुरावाविमानसेवेसाठी गत तीन वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी कळविले आहे. याचा उद्योजक व व्यावसायिकांनी मोठी लाभ होईल असेही त्यांनी म्हटले आहे. 

एअर डेक्कनकडून याबाबत मेल प्राप्त झाला आहे. 23 पासून 18 आसनी विमान जळगावला येईल. त्या दृष्टीने बहुतांश तयारीही पूर्ण झाली आहे.       -विजय चंद्रा, महाव्यवस्थापक, विमान विकास प्राधिकरण.