शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-भुसावळ चौथ्या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठीची मोजणी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:30 IST

रेल्वे प्रकल्पाला विरोध नाही : संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्याची नशिराबादच्या शेतक:यांची मागणी

ठळक मुद्देशेतकरी अनभिज्ञ आज मोजणी करण्यात येणार होतीएक दिवस अगोदर नोटीस

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 13 -  जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी रेल्वेचे प्रतिनिधी, भूसंपादन अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन आमच्याशी चर्चा करा, अशी मागणी नशिराबाद येथील शेतक:यांनी केली. यामुळे 13 पासून सुरू होणारी जमिनींची मोजणी अधिकारीवर्ग तेथे जाऊनही होऊ शकली नाही. जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गासाठी नशिराबाद येथील गट क्रमांक 235, 234, 226, 225,224, 779, 776, 769, 768, 751, 746, 744, 743 मध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यानुसार याची 13 सप्टेंबरपासून कार्यवाही सुरू करण्यात येऊन आज मोजणी करण्यात येणार होती. त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षकांनी मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील उप मुख्य अभियंत्यांना (निर्माण) पत्र देऊन रेल्वेचे प्रतिनिधी, 5 मजूर व आवश्यक साहित्य घेऊन सकाळी 8 वाजता हजर राहण्याबाबत कळविले होते. त्यानुसार भूमीअभिलेख कार्यालयाचे भूकर मापक (सव्रेअर) संदीप हिरोळे व रेल्वेचे प्रतिनिधी नशिराबाद येथे पोहचले. मात्र याबाबत शेतक:यांना कोणतीही माहिती नसल्याने या प्रकल्पाचा उद्देश व इतर माहिती मिळण्यासाठी भूसंपादन अधिकारी, रेल्वे प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात यावी, अशी मागणी शेतक:यांनी केली. त्यानुसार शेतक:यांकडून अधिका:यांनी पंचनामा लिहून घेतला. हा अहवाल भूमीअभिलेक कार्यालयाच्या वरिष्ट अधिका:यांना पाठविण्यात येणार असल्याचे संदीप हिरोळे यांनी सांगितले.

शेतक:यांची जमीन संपादीत करण्यात येत असली तरी त्याबाबत शेतक:यांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे शेतक:यांचे म्हणणे आहे. 12 रोजी एका व्यक्तीकडे नोटीस देण्यात आल्या व लगेच 13 पासून मोजणी करण्यास सुरू करणे म्हणजे शेतक:यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा शेतक:यांनी आरोप केला. 

विरोध नाही, मात्र चर्चा कराया ठिकाणी होणारा प्रकल्प, विकासाला आमचा विरोध नाही, मात्र या बाबत सार्वत्रिक चर्चा होऊन माहिती मिळणे गरजेचे असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. या बाबत शेतक:यांनी बुधवारी संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन अधिका:यांची भेटही घेतली व आपली हरकत नोंदविली. 

या प्रकल्पाला शेतक:यांचा विरोध नाही, मात्र या बाबत त्यांना माहिती मिळणे गरजेचे आहे. एक दिवस अगोदर नोटीस काढणे व लगेच मोजणी करणे गैर आहे. याबाबत संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्याची मागणी आहे.- लालचंद पाटील, जि.प. सदस्य, नशिराबाद

नशिराबाद येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी गेल्यानंतर शेतक:यांनी संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांच्याकडून पंचनामा लिहून घेतला. तो वरिष्टांकडे पाठविण्यात येईल. - संदीप हिरोळे, भूकर मापक, भूमी अभिलेख कार्यालय