शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समिती नसताना ५ पट दंड रद्दचा अहवाल स्वीकारणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:34 IST

मनपा उपायुक्तांचा अहवाल : ठराव विखंडनाचा चेंडू नव्या आयुक्तांकडे

जळगाव : महानगरपालिकेच्या २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत गाळेधारकांवरील पाच पट दंड रद्द करण्याचा केलेला ठराव मनपाकडून विखंडनासाठी पाठविण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ५ पट दंड रद्दसाठी जी समिती स्थापन केली होती, त्यासमितीचा ठराव शासनाकडे विखंडनासाठी पाठविला असताना, त्यासमितीच्या अहवालावरून ५ पट दंड रद्दचा ठराव करणे चुकीचे असून हा ठराव विखंडनासाठी पाठविण्याचा अहवाल उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी दिला आहे.दरम्यान, उपायुक्तांनी आपला अहवाल तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे ८ मार्च रोजीच दिला होता. मात्र, डांगे यांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांशी वैर न पत्करता हा ठराव विखंडनाची जबाबदारी नवीन आयुक्त उदय टेकाळे यांच्यावर सोपविला आहे. ५ पट दंड रद्दचा ठरावाप्रकरणी आता आयुक्त टेकाळे काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ठराव विखंडनासाठी जावा ही तर ‘भाजपा’चीच इच्छा ?५ पट दंड रद्दच्या ठरावावेळी भाजपाचे आठ नगरसेवक गैरहजर होते. तसेच जे नगरसेवक हजर होते, त्यांना देखील अजूनही या ठरावाबाबत न्यायालयात कोणी याचिका दाखल केली तर किं वा लेखापरीक्षात काही त्रुटी निघाल्या तर अडचण निर्माण होण्याची भिती आहे.त्यामुळे ५ पट दंड रद्दचा ठराव प्रशासनाने विखंडनासाठी पाठवावा अशी इच्छा भाजपा नगरसेवकांचीच असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपाकडे आता गाळेधारकांना आपण ठराव केला असे सांगण्यासाठी असून, ठराव विखंडनासाठी पाठवला तर सर्व खापर प्रशासनावर फोडण्याचीही तयारी भाजपाने सुरु केली आहे.आयुक्त टेकाळेंच्या निर्णयाकडे लक्षगाळेधारकांवरील ५ पट दंड रद्दचा ठरावासाठी सत्ताधारी भाजपाने प्रयत्न केला होता. तसेच गाळेधारकांना अनेकदा भाजपाने ५ पट दंड रद्दबाबत आश्वासने देखील दिली होती. त्यामुळे हा ठराव सत्ताधारी भाजपासाठी महत्वाचा आहे. मात्र, प्रशासनाने हा ठराव विखंडनासाठी पाठवला तर गाळेधारकांसह सत्ताधाऱ्यांनाही धक्का बसल्यासारखाच राहणार आहे. त्यातच तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी या ठरावावर सावध भूमिका घेत विधीतज्ज्ञांचा सल्ला घेतला. मात्र, विखंडनाची जबाबदारी दोन दिवसांपुर्वी मनपात रुजू झालेले आयुक्त उदय टेकाळे यांच्यावर टाकून दिली आहे. त्यामुळे हा ठराव विखंडनासाठी पाठविल्यास आयुक्त सत्ताधाऱ्यांची नाराजी ओढवून घेवू शकतात. त्यामुळे टेकाळे हा ठराव विखंडनासाठी पाठविण्यासाठी किती काळ घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.विधी तज्ज्ञांनी मनपा प्रशासनावर सोपविला निर्णयमनपा प्रशासनाने गाळेधारकांवरील ५ पट दंड रद्दसाठी करण्यात आलेल्या ठरावाबाबत विधीतज्ज्ञांकडून अभिप्राय मागितला होता. गेल्या आठवठ्यात विधीतज्ज्ञांकडून या ठरावाबाबत आपले मत मनपाला कळविले. यामध्ये म्हटले आहे की, प्रशासनाने समिती गठीत करण्याचा ठराव विखंडनासाठी पाठविला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे समिती ठराव मंजूर झाल्याचा ठराव नाही. तसेच महासभा ठराव क्रमांक ११२ हा प्रशासनाचा मुळ विषय नसून, शासनाच्या १८ डिसेंबर २०१८ व १० डिसेंबर २०१८ च्या आदेशाच्या विचार करता हा ठराव विखंडनासाठी पाठविण्याचा अधिकार मनपा प्रशासनाचा असल्याचे मनपाचे विधीतज्ज्ञ अ‍ॅड.केतन ढाके यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.