शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शिक्षणातून उत्तम नागरिक घडेल हे शिकवले गेले पाहिजे- डॉ.के.बी.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 18:55 IST

शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले.

ठळक मुद्देचोपडा येथे 'सुशील शिक्षक पुरस्कार' वितरणभगिनी मंडळाचा व्यावसायिक शिक्षणक्रम चांगला

चोपडा, जि.जळगाव : शिक्षणातून समाजात उत्तमपणे वागायला शिकवणे, उत्तम नागरिक निर्माण करणे हे शिकवले गेले पाहिजे. उत्तम व्यक्तिमत्व आणि उत्तम समाजजीवनाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील यांनी केले.चोपडा येथे भगिनी मंडळ संस्थेतर्फे १ डिसेंबर रोजी आयोजित 'सुशील शिक्षक पुरस्कार' वितरणप्रसंगी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक आशिष अरुणलाल गुजराथी, भगिनी मंडळाच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, उपाध्यक्ष छाया गुजराथी, निवृत्त मुख्याध्यापक सुभाष पाटील, नपा गटनेते जीवन चौधरी, नगरसेवक रमेश शिंदे, हुसेन पठाण, जितेंद्र देशमुख, जि.प. सदस्या डॉ.नीलम पाटील, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाट, संचालिका संध्या गुजराथी, कल्पना पोतदार उपस्थित होते.भगिनी मंडळ संस्थेच्या माजी अध्यक्षा डॉ.सुशीलाबेन शहा यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या या 'सुशील शिक्षक पुरस्कार' वितरणप्रसंगी ते बोलत होते.भगिनी मंडळाने पारंपरिक अभ्यासक्रम सुरू न करता व्यावसायिक शिक्षणक्रम सुरू करत एक चांगला प्रयत्न केला आहे. तो भविष्यात कायम राहावा. 'सुशील शिक्षक पुरस्कार' हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत डॉ.के.बी.पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी मान्यवरंनी मनोगत व्यक्त केले.जितेंद्र जोशी यांना 'सुशील शिक्षक पुरस्कार'भगिनी मंडळ संस्थेच्या संचलित महिला मंडळ वोळूंतरी स्कूलमधील उपशिक्षक जितेंद्र नरेश जोशी यांना माजी डॉ.के.बी.पाटील यांच्या हस्ते पहिला 'सुशील शिक्षक पुरस्कार' प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.सूत्रसंचालन संजय बारी यांनी, मान्यवरांचा परिचय डॉ.विष्णू गुंजाळ यांनी करून दिला. प्रारंभी महिला मंडळ माध्यमिक विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, स्कूल आॅफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. यावेळी शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी, राजकीय संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयChopdaचोपडा