शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पैसे न भरता रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करणे आता शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 15:07 IST

आयआरसीटीसीची अद्ययावत नवीन  ई-पे लेटर योजना प्रवाशांसाठी सुरू

भुसावळ : जास्तीत जास्त प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करावा यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसले तरीही रेल्वे प्रवासाचे तिकीट बुक करता येणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने ‘ई-पे लेटर’ (ई-पे लेटर) ही नवीन योजना प्रवाशांसाठी आणली आहे. या योजनेत मात्र तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनी प्रवाशाला पैसे भरावे लागणार आहेत.असे करा तिकीट बुकआयआरसीटीसीमध्ये नवीन अकाउंट तयार करा किंवा आधीचे अकाउंट असेल तर लॉग इन करा. जे तिकीट बुक करायचे आहे त्याविषयी डिटेल्स भरा. तुमच्या सोयीनुसार ट्रेन निवडा आणि नंतर बुक नाऊवर क्लिक करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला प्रवासाचा तपशील आणि कॅपचा कोड भरावं लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढच्या बटनावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल. त्यात तुम्ही डेबिट, क्रेडिट, भीम अ‍ॅपचे डिटेल्स भरा. त्यानंतर ई-पे लेटरचे आॅप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ई-पे लेटरवर रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.ई-पे लेटर.इन जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बिल पेमेंटच आॅप्शन येईल. तो सिलेक्ट केल्यावर प्रवासाचे तिकीट मिळेल.ई-पेमेंट योजनाया योजनेसाठी अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट मदत करेल. योजनेत आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर पैसे न भरता आॅनलाइन तिकीट बुक करता येईल. त्याचं पेमेंट १४ दिवसांनंतर करावे लागेल. या सेवेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांना पेमेंट करताना ३.५ टक्के चार्ज द्यावा लागेल. १४ दिवसांच्या आत पेमेंट करत असाल, तर जास्त व्याज द्यावं लागणार नाही. तुम्ही वेळेवर पैसे भरलेत तर तुमची क्रेडिट लिमिटही वाढेल.तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनंतरही तुम्ही पेमेंट केलं नाहीत, तर तिकिटाच्या किमतीवर व्याज घेतलं जाईल. त्याहून जास्त उशीर केलात तर तुमचं अकाउंट रद्द होऊ शकतं.ई-पे सेवा या सेवेचा फायदा तुम्ही तुमच्या आयआरसीटीसी अकाउंटवरून घेऊ शकता. तुम्ही घेतलेल्या तिकिटाची किंमत तुमच्या क्रेडिटमध्ये असायला हवी आणि ठरलेल्या वेळेत पेमेंट व्हायला हवं. तुम्ही पेमेंट करायला उशीर केलात तर तुमचं के्रडिट कमी होईल. यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही, अशीही ही योजना आहे.मात्र या योजनेत सहभागी होताना तुमच्याजवळ पैसे नसले तरी पुढील प्रवासासाठी तुम्ही आरक्षित तिकीट बुक करू शकणार आहात.