शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी पहारने तिजोरी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:28 IST

भुसावळातील या धाडसी घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये मोठी खबराट पसरली आहे. पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे.

xभुसावळ: वसंत टॉकीज मागील मेथाजी प्लॉट येथे बंद असलेल्या ब्रिटिशकालीन जुन्या बंगल्यात चोरट्यांनी दरोडा टाकून ३० हजार रोख, महत्त्वाचे दस्तावेज व भांडी चोरल्याची घटना २० रोजी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. यामुळे खळबळ उडाली. शहराच्या मध्यभागी वसंत टॉकीजच्या मागे मेथाजी प्लॉटमध्ये अशोकरॉय कुमुदचंद लायवाला व त्यांच्या पत्नी राजश्री लायवाला हे दोन महिन्यापासून सुरत येथे मुलांकडे गेले होते. दोन महिन्यांपासून बंद असलेल्या घरात २० रोजी नवजीवन एक्स्प्रेसने आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी इमारतीला लागून असलेल्या पूर्वेकडील खुल्या जागेवरून गॅलरीला पांढऱ्या रंगाच्या वायरच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर चढले. एकूण सहा खोल्या असलेल्या या बंगल्यात दोन खोल्या सोडून इतर चार खोल्यांमध्ये चोरट्यांनी नासधूस, फेकाफेक केली. घराच्या पूर्वेकडील गॅलरीत चढल्यानंतर स्वयंपाक घराच्या खिडकीचे ग्रील, लोखंडी जाळी व काचा फोडून आत प्रवेश केला. कडीकोयंडा तोडले. मध्यभागी असलेल्या खोलीमधील कपाटांची कुलूप तोडली. सामानाची नासधूस केली. याच खोलीतील जुन्या पद्धतीची तिजोरी लोखंडी पहारने तोडून त्यातील ३० हजार रुपये व महत्त्वेचे खरेदीखत, दस्तावेज लांबवले. जुनी नाणीही लांबवली. पितळाची भांडी लांबवली. लोखंडी पहार, चाकू, लोखंडी सळई अशा शस्त्रांचा वापर केल्याचे दृश्य होते.दरम्यान, भुसावळातील या धाडसी घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये मोठी खबराट पसरली आहे. पोलिसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे.चोरट्यांचे लक्ष दस्तावेजांवरआपल्याकडे २४ जून २०१७ मध्ये ही अशीच चोरी झाली होती,असे लायवाला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान शहरांमध्ये दरोडे,लूटपाटीच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, लायवाला यांच्या घरातील तिजोरीतून चोरट्यांनी काही मालमत्तांचे दस्तावेज लांबविले आहेत.याचा अर्थ त्यांचे लक्ष दस्तावेज असावेत.