शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

इरा, गूगल आणि आम्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:06 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात लिहिताहेत कवी नीरज देशपांडे...

हाय गूगल असं म्हणत आमची इरा हिरमुसत म्हणाली, ‘आई, ‘हे गूगल’ होत नाहीये! सांग ना रेंजला’ आता ना इथे टीव्ही ना मोबाइल मग हा गूगल हिला दिसला तरी कुठे?काहीशा कॅज्युअल नजरेने आम्ही एकमेकांकडे पाहिलं, पडलेला प्रश्न फारसा महत्वाचा नाही म्हणून माना डोलावल्या आणि परत कामाला लागलो. पण खरंच, किती पद्धतशीरपणे कुठे अडल्यावर ‘हे भगवान’, ‘हे पांडुरगा’ असे वापरले जाणारे शब्दप्रयोग ‘हे गूगल’ने पार बदलून टाकले आहेत याची अचानक जाणीव झाली. ह्याची सुरुवात झाली ती दसऱ्याला, जेव्हा आमच्या घरात डब्बा टीव्ही काढून एंड्रॉइड स्मार्ट टीव्ही आला. डेमो देणारा आम्हाला ‘हे गूगल’ म्हणून टीव्ही कसा आपल्या आदेशाचा गुलाम आहे हे दाखवू लागला. नव्याचे नऊ दिवस हे इथे मात्र अपवादात्मक वाटले आणि बघता बघता घरी येईल त्याला ‘हे गूगल’, ‘हे गूगल’ करून दाखवण्याच्या नादात आम्हीच कधी त्याचे गुलाम झालो ते आम्हालाही कळलं नाही. असंच नाही स्मार्ट म्हणतात ह्या पठ्ठ्याला! असो. सध्या ‘अमूकला मराठीत काय म्हणतात’पासून तमूक पदार्थांची रेसिपी आणि जगाच्या कानाकोपºयात काय चाललंयपासून ते कुठल्या गल्लीत कोण राहतंयपर्यंत नाना प्रश्नांची, नाना कलांची आणि कळांची उकल हा गूगल बाबा सहजतेने करतो म्हटल्यावर ‘नेक्स्ट टू गॉड’च भासणार ना? बरं, कृत्रिम का असेना पण ही बुद्धिमत्ता दिसत असल्याने सिद्ध वगैरे करण्याचे चॅलेंज अजून तरी कोणीही दिलेले नाही. किती व्यापून टाकलंय ना ह्या तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्याला! घरातल्या ताई-दादाला स्पेलींग विचारणारे आपण ह्या गूगलचं बोट धरुन आपल्याच नट्यांना पारखे तर झालो नाही ना? पण मग शाळेनंतर हरवलेले आपले मित्र, मैत्रिणी ह्या गूगलनेच तर शोधून दिलेत आपल्याला. एकिकडे आपला असिस्टंट झालेला हा गूगल आपल्याला आळशी बनवतो तर ज्ञानाचा खजिनाही उघडतो पण कुठलं ज्ञान कुणी घ्यावं हे मात्र ज्याचं त्यानं ठरवायला हवं.डिजिटल क्रांतीची वेस ओलांडून आपण केव्हाच पलिकडे आणि फार पुढे आलो आहोत, तेव्हा ‘आमच्या वेळी’चं ओझं घेऊन फरफटत जाण्यापेक्षा ह्या घसरगुंडीवरुन सुसाट निघूयात; तंत्रज्ञानाचे कठडे घट्ट धरून. हे विठ्ठला! कलीयुगातील हा तुझाच तर अवतार नाही ना? आणि अलेक्सा, सिरी ह्यांचं काय? # हाय गूगल, बघू या.-नीरज पद्माकर देशपांडे, नंदुरबार

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार