शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:01 IST

ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना काटेरी झाडेझझुडपांनी चांगलाच विळखा घातल्याने काटे लागून एसटी बसमधील प्रवासी जखमी होत आहे.

ठळक मुद्देएसटी बसमधील प्रवाशांना होते दुखापतसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना काटेरी झाडेझझुडपांनी चांगलाच विळखा घातल्याने काटे लागून एसटी बसमधील प्रवासी जखमी होत आहे. अनेक गावांच्या रस्त्यावर दुचाकी व इतर वाहनांचे अपघातदेखील होत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी असताना या विभागाचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांचे गाव असलेल्या दोधवद हिंगोना रस्त्यावरदेखील अशीच परिस्थिती आहे. याशिवाय कलाली, निम, तांदळी, कळमसरे परिसर, मुडी मांडळ परिसर, मंगरूळ परिसर, फाफोरे परिसर, पातोंडा व टाकरखेडा परिसर आदी गावांकडील रस्त्यांवर हेच चित्र असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ग्रामीण भागात आताच एस टी बस सुरू झाल्या आहेत. प्रवास करताना एसटीच्या खिडक्या उघड्या राहत असल्याने वाटेत अचानक काटेरी बाभूळ आले असता, ते खिडकीतून आत घुसून अनेक प्रवाशांना डोळ्यांना अथवा चेहऱ्याला इजा होत असते. विशेष करून बालके खिडकीतच बसत असल्याने ते यात जखमी होत असतात. यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहे.याशिवाय अनेक गावांच्या रस्त्यावर वळणे असून याठिकाणीच ही काटेरी झुडपे वाढली असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे दुचाकी व इतर वाहने एकमेकांना धडकून अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी मारवड बोहरा रस्त्यावरदेखील झाडे झुडपांमुळे दुचाकीस्वारांचे दोन अपघात झाले होते. यात दोन जण गंभीर जखमी झाल्याने ते अनेक दिवस खाजगी रुग्णालयात दाखल होते. यामुळे ग्रामस्थांची ओरड होऊनदेखील संबंधित विभागाने झाडे झुडपे काढली नाहीत. अखेर बोहरा ग्रा.पं.चे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी स्वखर्चाने ही झाडे झुडपे काढली होती.

बांधकाम विभागास दिल्या स्पष्ट सूचना-आ.अनिल पाटीलअमळनेर तालुका व परिसरात अनेक गावांच्या रस्त्यालगत काटेरी झाडे झुडपे वाढल्याचे मी स्वतः पाहिले असून यासंदर्भात अनेक गावातून तक्रारीदेखील माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत,यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागास झाडे झुडपे काढण्याबाबत आधीच पत्र दिले आहे. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तशा सूचनादेखील केल्या आहेत.-आमदार अनिल पाटील, अमळनेर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAmalnerअमळनेर