शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:42 IST

शुभम पाटील व मनिषा चौधरी यांचे यश

ठळक मुद्देविद्यापीठाला मानाचा तुरा

जळगाव : गुजरात येथील गणपत युनिर्व्हसिटी येथे झालेल्या आठव्या अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच्या शुभम पाटील याने बेसिक सायन्स तर मनिषा चौधरी हिने सोशल सायन्स गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे़ संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त करणारे हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.१२ ते १४ मार्च या कालावधीत नवी दिल्ली येथील असोसिएशन आॅफ इंडियन युनिर्व्हसिटी यांच्यावतीने गुजरातमध्ये ही आठवी अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धा झाली. पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग आणि मध्य विभाग या पाच विभागांमधून जिंकून आलेले प्रत्येकी पंधरा विजेते या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी शुभम पाटील याने बेसिक सायन्स या गटात आणि मनिषा चौधरी या विद्यार्थिनीने सोशल सायन्स या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांपेक्षा प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिक पटकावून हे विद्यापीठ महाराष्ट्रात तर अग्रेसर राहिलेच यासोबतच देश पातळीवर देखील अग्रेसर राहिले. या स्पर्धेच्या फेरीत प्रत्येक गटातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचे सुवर्णपदकासाठी पुन्हा सादरीकरण घेण्यात आले. त्यासाठी निवडण्यात आलेल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये शुभम पाटील व मनिषा चौधरी या दोघांचा समावेश आहे. शुभम हा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत एम.एस्सी. द्वितीय वर्षात शिकत आहे. या स्पर्धेत दिव्यांग लोकांसाठी त्याने तयार केलेले हिअरींग गॅझेट ठेवण्यात आले होते. जन्मत: ज्या लोकांना ऐकायला येत नाही अशा लोकांना दातांच्या कंपनाद्वारे ऐकायला येण्यासाठीचे संशोधन त्याने केले आहे. त्यासाठी त्याने मोबाईलमध्ये एक अ‍ॅप विकसित केले असून या माध्यमातून मोबाईलच्या अ‍ॅपमधून दातांमध्ये होणाऱ्या कंपनाद्वारे दिव्यांग लोकांना ऐकू येवू शकते. या संशोधनासाठी त्याने आतापर्यंत १२८ दिव्यांग मुलांवर व ६५ दिव्यांग प्रौढांवर प्रयोग केले.स्वसंरक्षणार्थ पाण्याच्या बॉटलची निर्मितीमनिषा चौधरी ही शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थिनी आहे. महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी तिने महिलांच्या स्वसंरक्षणार्थ पाण्याची बॉटल तयार केली आहे. बेस्ट इमर्जन्सी डिफें डिंग इन्स्टश्वयमेंट असे या बॉटलचे नाव आहे. या बाटलीत पिण्याचे पाणी, कटर, टॉर्च, सायरन, जीपीएस, करंट बटन इमर्जन्सी मॅसेज सिस्टीम, आॅटोकॉल रिसिव्ह, चिलि स्प्रे या सारखे नऊ स्वसंरक्षणाचे गॅझेट बसविले आहेत. या बाटलीचे तिने पेटंट फाईल केले आहेत.