शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षानंतर होणार 'आविष्कार' संशोधन स्पर्धा; १८ ऑक्टोंबरला जिल्हास्तरीय स्पर्धा, स्वतंत्र पोर्टलची निर्मिती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 16:00 IST

विद्यार्थीदशेत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यपालांनी दरवर्षी विद्यापीठ स्तरावर व त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धा सुरू केलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने दि. १८ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून ही संशोधन स्पर्धा होवू शकली नव्हती.

विद्यार्थीदशेत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यपालांनी दरवर्षी विद्यापीठ स्तरावर व त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धा सुरू केलेली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने यंदा १८ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी जळगाव,धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्ह्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठातील प्रशाळांसाठी ही संशोधन स्पर्धा होईल. जिल्हा स्तरावरील अविष्कार स्पर्धा झाल्यांनतर त्यातील विजेत्यांची स्पर्धा ११ व १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

विषय निहाय सहा गट...या स्पर्धेत विषय निहाय सहा गट करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या गटात सामाजिकशास्त्र, शिक्षण, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुसऱ्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसऱ्या गटात विज्ञान ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणशास्त्र, चौथ्या गटात कृषी आणि पशुसंवर्धन, पाचव्या गटात. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, व सहाव्या गटात औषधिनिर्माणशास्त्र यांचा समोवश आहे.  ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तरपदवी आणि शिक्षक या चार संवर्गात होणार आहे.

१५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले...जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेचे संयोजकत्व स्विकारण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. १५ सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयांनी हे प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

८ ऑक्टोंबरपर्यंत नाव नोंदणी करावी लागणारया स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अविष्कार या नावाने स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० सप्टेंबरपासून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व शुल्क भरता येईल, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक व संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सतीष कोल्हे, पदार्थ विज्ञान विभागाप्रमुख प्रा. जयदीप साळी व विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी केले आहे.