शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

खगोलशास्त्र व भौतिकशास्त्रात जगाला दखल घ्यायला लावणारे - मेघनाद सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:04 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत बारा बलुतेदार या सदरात लिहिताहेत खंडपीठातील वकील माधव भोकरीकर...

आपण 'तेली' शब्दाच्या व्युत्पत्तीकडे पाहिले, तर हा शब्द 'तैल' या संस्कृत शब्दापासून बनला आहे. तेला संबंधाने व्यवसाय करणारा, 'तेली' ही साधी उत्पत्ती आपणास समजू शकते. मात्र आपण पौराणिक आधार घेतला, तर याच्या काही मनोरंजक गोष्टी समजतात. शंकराने आपल्या शरीरापासून निर्मिती करून, त्यांना आपल्या शरीराचे मर्दन तेलाने करण्यास सांगितले. यासाठी एक बैल मदतीला दिला. तेल कसे गाळावे हे सांगितले. त्यामुळे या समाजाचा मुख्य व्यवसाय तेलबियांपासून तेल गाळणे आहे.कालौघात सर्व व्यवसायांचे यांत्रिकीकरण झाल्याने तशी मक्तेदारी आता कोणत्याचीही व्यवसायात राहीलेली नाही. त्यामुळे पशुपालन, शेती, शेळीपालन, यातून निर्माण होणारे विविध व्यवसायात, तसेच विविध प्रकारच्या नोकऱ्यांमध्येदेखील त्यांनी बस्तान बसविले आहे. उत्तर भारतात दुग्ध व्यवसाय, राजस्थानात तेल व्यवसाय, हॉटेल व्यवसाय तर पंजाबमध्ये कात्री बनविण्याच्या उद्योगात ठळकपणे दिसतात. यातील काही त्यांच्या सांपत्तिक स्थितीमुळे सावकार म्हणून ओळखले जातात. राजकारणातदेखील चांगले बस्तान बसविले आहे. या समाजात त्यांच्या उद्योगप्रियतेमुळे, शिक्षणाकडे असलेल्या लक्षामुळे दारिद्र्य आढळत नाही.हिंदू धर्मातील घटक असलेला समाज, त्या संस्कृतीप्रमाणे आपले आचरण करतो. त्या राज्यातील असलेली भाषा हे बोलतात. उत्तर भारतात 'मलिक', मध्य प्रदेशात 'साहू' म्हणून ओळखले जातात. मुलांना, मुलींना पण शिक्षणाच्या बाबतीत यांच्यात फारसा भेदभाव आढळत नाही. मुलींना तुलनेने सारखीच वागणूक मिळते, जरी तिचे स्थान कुटुंबात दुय्यम असले तरी! हिमाचल प्रदेशातील यांच्या समाजातील महिला या 'चंबा' नावाने ओळखल्या जाणाºया भरत कामात कुशल असतात.'तेली पंचायत' म्हणून असलेली व्यवस्था समाजातील बरेचसे कौटुंबिक वादविवाद, समाजहित लक्षात घेऊन सोडवितात. मुलाच्या जन्माच्या वेळी, लग्नाच्या वेळी देवदेवतांची पूजा-प्रार्थना करण्याची पद्धत आहे. 'मनसा देवी' म्हणजे आपल्या मनोआकांक्षा पूर्ण करणारी देवी दैवत असते. अंत्यसंस्कार झाल्यानंतरची रक्षा गंगेत सोडून देण्याची याची रूढी आहे. अकराव्या शतकातील बांधलेले 'तेली का मंदिर' हे ग्वालियर येथील भगवान विष्णूचे मंदिर, उत्तर आणि दक्षिण कला स्थापत्याचा सुंदर आविष्कार आहे. या 'तेली' समाजातील व्यक्तींनी, आपल्या समाजाच्या उत्थानात आपला मोलाचा वाट उचलला आहे. या समाजातील काही, प्रसिद्ध व्यक्ती बघितल्या तर समजू शकेल. संताजी जगनाडे महाराज- हे तेली समाजातील संत. इ.स. १६२४ ते इ.स. १६८८ दरम्यान महाराष्ट्रातील देहू गावाजवळच्या सुदुंबरे गावी होऊन गेले. संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांचे लेखन यांनी केले. हे 'सन्तु तेली' या नावाने परिचित होते. संत तुकारामांच्या सहवासात राहून त्यांनी तुकाराम महाराजांचे अभंग लिहीण्यास सुरुवात केली.'अभंग गाथा' इंद्रायणीत बुडवल्यानंतर, ती संताजी महाराजांना मुखोद्गत असल्याने, त्यांनी पुन्हा लिहिली. संत तुकारामांनी संताजींना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचनही दिले होते. मात्र ते संत संताजी महाराजांच्या पूर्वीच वैकुंठाला गेले. संताजींच्या अंतकाळी कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते. चेहरा झाकला जात नव्हता, तेव्हा वैकुंठाहून तुकाराम महाराज वचन पूर्ण करण्यासाठी आले. त्यांनी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला. त्यांचा हा अभंग-नको ते जोखड म्हणे गोरा कुंभार।रोहिदास चांभार तेचि म्हणे ।।नरहरी सोनार चोखा मेळा म्हणे।आमुचिही मने बिघडविली।।संतु तेली म्हणे घाण्याचे जोखड।आहे फार जड जगामाजी।।भारतीय खगोलशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ म्हणून विख्यात असलेले, आणि 'नोबेल पुरस्कारासाठी' एकापेक्षा जास्तवेळा नामांकन मिळालेले आणि भारतातील नद्यांचे नियोजनाचे शिल्पकार, ज्यांनी 'बंगालचे अश्रू' समजल्या जाणाºया 'दामोदर नदीच्या' नेहमी येणाºया पुराच्या संकटाचे काय नियोजन करता येईल.याचा आराखडा बनविला, ते कै.मेघनाद साहा, याच समाजाची देणगी! भारताचे खंबीर, करारी नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे याच समाजाचे!भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद याच समाजातील! युरोपमध्ये सन १९४८ साली प्रथम भारतीय उद्योगधंदा सरू करणारे पांडुरंग बनारसे, सन १९६५ मध्ये इंग्लंडमध्ये हिंदूधर्मीयांचे पहिले मंदिर बांधणारे याच समाजातील! (उत्तरार्ध)-अ‍ॅड.माधव भोकरीकर, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यRaverरावेर