शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळला साकारणार आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा

By admin | Updated: February 12, 2017 00:52 IST

तोरणमाळ, ता.धडगाव केंद्रातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नंदुरबार : राज्यात सर्वाधिक विद्यार्थी गळतीचे प्रमाण असलेल्या आणि भौगोलिक दृष्ट्या अतिदुर्गम भागात विस्तारलेल्या तोरणमाळ, ता.धडगाव केंद्रातील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी राज्य शासनाने त्या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेच्या बांधकामासाठी ४१ कोटी ७० लाख रुपयांचा निधीची तरतूदही करण्यात आली आहे.सातपुड्यातील तोरणमाळ हे राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हा भाग पूर्णत: सातपुड्याच्या डोंगरदºयात विस्तारल्याने या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी या भागात भेटी दिल्यानंतर या भागातील शाळांचे विदारक स्वरूप समोर आले. या पार्श्वभूमीवर तोरणमाळ केंद्रात येणाºया शाळांचे सर्वेक्षण झाल्यानंतर या केंद्रात सर्वाधिक म्हणजे ८५३ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याने शिक्षण विभागाने त्यावर गंभीरपणे चिंतन करून या भागातील गळती रोखण्यासाठी या ठिकाणी निवासी शाळा सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. प्रधान सचिव नंदकुमार, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घन:शाम मंगळे, तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी या ठिकाणी आंतरराष्टÑीय दर्जाची निवासी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.तोरणमाळ येथे प्रस्तावित असलेली ही शाळा १६०० विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. त्यात ८०० विद्यार्थी व ८०० विद्यार्थिनींचा समावेश आहे. या ठिकाणी ६१ हजार ६०४.५२ चौरस फूट क्षेत्रफळात शाळेच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी आठ कोटी ८० लाख ५४ हजार रुपयांचा खर्च तसेच विद्यार्थ्यांसाठी फर्निचरकरिता ३२ लाख असे एकूण नऊ कोटी १२ लाख ५४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृहे बांधण्यात येणार असून त्यासाठी ३२ कोटी ५८ लाख १८ हजार    रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असे एकूण या शाळेकरिता ४१ कोटी ७० लाख ७२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.तोरणमाळ येथील या प्रस्तावित शाळेसाठी साधारणत: पाच हेक्टर जागेची पहाणीही प्रशासनाने केली असून ही जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या शाळेत जिल्हा परिषदेतील निवडक होतकरू शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आंतरराष्टÑीय स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लवकरच       शाळेच्या कामाला सुरुवात करण्याबाबत प्रशासनाची तयारी सुरू आहे.

 

राज्यात १०० शाळांचा प्रस्तावराज्यात १०० आंतरराष्टÑीय दर्जाच्या निवासी शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव आहे. त्यातील प्रायोगिक तत्त्वावर तोरणमाळ केंद्राची निवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक गळतीचे प्रमाण या केंद्रात असल्याने या शाळेला प्राधान्य देण्यात आले आहे. येथील प्रयोगानंतर राज्यात इतर ठिकाणी शाळा सुरू होतील. सध्याची स्थिती पहाता या शैक्षणिक वर्षात ही शाळा सुरू होणे शक्य नाही. कारण तोरणमाळला भाड्याच्या इमारती मिळणेही अवघड असल्याने शाळा इमारतीचे बांधकाम तत्काळ होणे अपेक्षित आहे.