पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ जून रोजी एकाचवेळी राज्यभर धाडसत्र राबवून प्रेम नारायण कोगटा (रा. जळगाव), जयश्री अंतिम तोतला, भागवत गणपत भंगाळे (रा. जळगाव), जयश्री शैलेश मणियार, संजय भगवानदास तोतला (सर्व रा. जळगाव, ह.मु. मुंबई), छगन श्यामराव झाल्टे (रा. महुखेडा, ता. जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (रा. जामनेर), राजेश शांतीलाल लोढा (रा. जामनेर), आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रीतेश चंपालाल जैन (रा. धुळे), जयश्री अंतिम तोतला (रा. मुंबई, मूळ रा. जळगाव) या बड्या कर्जदारांना अटक केली होती. या सर्वांनी पुणे विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बुधवारी त्यावर निर्णय झाला. प्रत्येकी एक लाख रुपयांचा जात मुचलका त्याशिवाय दर महिन्याला १ व १५ तारखेला पुणे पोलिसांकडे हजेरी व ठेवीदारांशी कुठलाही संपर्क करायचा नाही या अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला.
बीएचआर घोटाळ्यात भागवत भंगाळेंसह ११ जणांना अंतरिम जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST