शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हुशार मंडळींना कोणी पुढे गेलेले सहन होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 10:52 IST

 पत्रकार परिषदेत खासदार ए.टी.पाटील यांनी पक्षांतर्गंत विरोधकांवर साधला निशाणा

पारोळा : जिल्ह्यात काही मंडळी हुशार आहेत, त्यांना कोणी पुढे गेलेले सहन होत नाही आणि मग अश्या पद्धतीने ( तिकीट कापून) मागे खेचण्याचे काम करतात, संघ परिवार देखील माझ्यासोबतच होता, पण असे का झाले हे मला सांगता येणार नाही, असे भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांनी म्हटले आहे.तिकिट कापल्यानंतर खासदार पाटील यांनी रविवारी सायंकाळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधला. पत्रकार परिषदेला अमळनेरचे माजी आमदार बी.एस.पाटील, भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सुरेंद्र बोहरा, तालुका अध्यक्ष अ‍ॅड.अतुल मोरे, शहर अध्यक्ष मुकुंदा चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.लोकसभेच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी आपली भेट घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केल्याचे खासदार .पाटील यांनी सांगितले.पारोळा तालुका अध्यक्ष अतुल मोरे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्राचे संघटन मंत्री पुराणिक यांच्याकडे कैफियत मांडणार असल्याचे सांगितले.दरम्यान शनिवारी आमदार स्मिता वाघ यांनी पारोळ्यात येऊन भेट घेतल्यावेळी ए.टी. पाटील यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्याची चर्चा होती.स्मिता वाघ यांनी घेतली भेट४आमदार स्मिता वाघ यांनी शनिवारी संध्याकाळी १५ ते २० मिनिटे आपल्यासोबत चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सहकार्य करा, असे आवाहन केले. आपले तिकिट कापल्यानंतर काही समर्थकांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेतली. मात्र यावेळी आमदार स्मिता वाघ यांच्या विरोधात घोषणाबाजी वगैरे न करता केवळ चर्चा केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.४यावेळी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी ए.टी.पाटील यांच्यासारख्या सक्षम खासदारांचे तिकीट कापले गेले याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली. याबाबत आम्ही जिल्हा कमिटी व वरिष्ठांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अजून ही वेळ गेलेली नाही जसे क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच असते तसेच राजकारणात देखील शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकते असे सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारण