शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात चार पुरवठा अधिका-यांमार्फत रेशन गोदामांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 13:23 IST

अहवाल जिल्हाधिका-यांकडे सादर

ठळक मुद्देदोन्ही अहवालात दडलय काय?दोनही अहवालाबाबत गुप्तता

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31 -जिल्ह्यातील रेशनच्या गोदामांची मुंबईच्या पथकाने तपासणी केल्यानंतर उर्वरित  चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांची बाहेरील जिल्ह्यातील पुरवठा अधिका:यांमार्फत तपासणी करण्यात आली. याचाही अहवाल या अधिका:यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सादर केला. दरम्यान, दोनही अहवाल अद्याप पाहिले नसल्याचे जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी सांगितले. माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी भुसावळ येथे रेशनच्या गोदामांची अचानक पाहणी केल्यानंतर तेथे अनियमितता आढळून आली होती. या संदर्भात खडसे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री  गिरीश बापट यांच्याकडे तक्रार  केली होती.  या तक्रारीनुसार मुंबई येथील 12 जणांचे पथक जिल्ह्यात आले होते.  या  पथकाने जिल्ह्यातील गोदामांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान काही गोदामातील दप्तरही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुरुवारी  जिल्हाधिका:यांना अहवाल सादर केला होता. यामध्ये जिल्ह्यातील   चोपडा, यावल, जामनेर या तालुक्यातील गोदामांची  तपासणी राहिली होती. त्यासाठी  दुसरे एक पथक जिल्ह्यात येणार होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी स्थानिक पातळीवर तपासणी करण्याविषयी जिल्हाधिका:यांना सूचविले होते. मात्र स्थानिक पातळीवर तपासणी केल्यास अडचण नको व नि:संशय तपासणी व्हावी म्हणून बाहेरील पथकाची मागणी केली होती. त्यानुसार धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर येथील जिल्हा पुरवठा अधिका:यांमार्फत वरील तालुक्यातील गोदामांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी या अधिका-यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्याकडे सादर केला. या दोनही अहवालाबाबत गुप्तता पाळली जात असल्याने अहवालात काय दडलय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मुंबईच्या पथकामार्फत गोदामांची तपासणी केल्यानंतर उर्वरित तालुक्यातील गोदामांची तपासणी करण्यासाठी चार पुरवठा अधिकारी आले होते. त्यांनीही अहवाल दिला आहे. दोन्ही अहवाल अद्याप पाहिले नाही. - किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.