शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विभागीय आयुक्तांच्या पथकाकडून गटविकास अधिकाऱ्याची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 15:58 IST

बोदवड पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराबाबत आमदारांनी केली होती तक्रार

बोदवड: पंचायत समितीने भ्रष्टाचाराचा तालुक्यात कळस गाठला आहे. याची दखल घेत नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या पथकान थेट येथे येत चौकशी सुरु केली आहे. हे पथक गुरुवारी दिवसभर बोदवड पंचायत समितीत कागदपत्राची तपासणी करत होते,बोदवड तालुक्यातील पंचायत समिती मध्ये तत्कालीन व सध्या भडगाव येथे असलेले गट विकास अधिकारी आर. ओ .वाघ यांच्या कार्यकाळात तालुक्यात ५०० घरकुल रमाई घरकुल योजनेत मंजूर झाले होते,. परंतु सदर योजने अंतर्गत फक्त ३०० घरकुलाची गरज असल्याचे दाखवत २०० घरकुल प्रकरणे त्यांनी लाभार्थी असून सुद्धा परत पाठवले. तर परत पाचशे घरकुलांची मागणीही केली, त्याच प्रमाणे तालुक्यात चौदाव्या वित्त आयोचा निधी शिल्लक असताना देखील कोल्हाडी व बोरगाव येथील ग्रामनिधी शिल्लक नसल्याचे नमूद करत कामे केली नाही. तर चौदाव्या वित्त आयोगात कोल्हाडी ग्रापंत २६ लाख सत्तावीस हजार निधी शिल्लक आहे, तर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या संरक्षण भिंतींबाबत कोल्हाडी, बोरगाव, सुरवाडे, मुक्तळ, चिखली, शेलवड, लोणवाडी या गावातील कामाच्या तक्रारी असून सुद्धा चौकशी केली नाही त्याच प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगचा निधी मान्यता नसताना खर्च केला असून त्याचीही कर्यावही केली नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील स्वच्छ भारत अभियानाच्या योजनेत भ्रष्टाचार त्याच प्रमाणे दलित वस्ती सुधार योजनेचा निधी परस्पर वर्ग करणे या सारखे आरोप असून त्याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी आयुक्तांकडे तर तालुक्यातील शेलवड येथील दीपक माळी, व मोतीराम भोई आदींनी आमदार तसेच जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच शेलवड येथील तत्कालीन सरपंच व आताचे सरपंच निलेश माळी यांनी गावातील सार्वजनिक भूखंड शासनाची परवानगी न घेता परस्पर विकल्याची तक्रार दिली होती, या सर्व प्रकणाच्या साठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या पथकाने गुरुवारी बोदवड पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ याना बोलवून बोदवड पंचायत समिती मध्ये चौकशी केली यात दिवस भर विविध प्रकरच्या फायली, कागदपत्रे घेऊन सदर पथक बसले होते,सदर पथकात धुळे जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी बी. एम. मोहन, धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकरी अधिकारी प्रकाश खोतकर , जळगाव जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, यांच्यासह चार अधीकारी व कर्मचारी होते. याप्रकरणी चौकशी अधिकारी प्रकाश खोतकर यांची प्रतिक्रिया घेतलीं असता विभागीय आयुक्तांच्या आदेशाने आम्ही चौकशीसाठी आलो असून चौकशी अहवाल आयुक्तांना देण्यात येईल. फोटो : क्रमांक०४ एचएस के 09 बोदवड पंचायत समित कागदपत्रे तपासत असताना चौकशी अधिकारी (छाया : गोपाल व्यास)