शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील गुन्ह्यांची माहिती आता एका ‘क्लिक’ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 20:31 IST

देशभरात घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याची अथवा आरोपीची माहिती हवी असेल तर आता तपासाधिकाºयांना त्या-त्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. या गुन्ह्यांची माहिती तसेच स्टेशन डायरी ‘सीसीटीएनएस’ प्रणालीशी जोडली जाणार असून त्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत देशभरातील सर्व पोलीस ठाणे एकमेकांशी आॅनलाईन झालेच पाहिजे अशी तंबी वजा आदेश केंद्र सरकारने काढले आहेत.  

ठळक मुद्देपोलीस ठाण्यांचे डिजीटलायझेशनपोलिसांचे काम अधिक सोपे   १९९८ या वर्षापासूनचा डेटा संगणकात समाविष्ट 

 सुनील पाटील,आॅनलाईन लोकमत जळगाव दि,२५ : देशभरात घडलेल्या कोणत्याही गुन्ह्याची अथवा आरोपीची माहिती हवी असेल तर आता तपासाधिकाºयांना त्या-त्या पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. या गुन्ह्यांची माहिती तसेच स्टेशन डायरी ‘सीसीटीएनएस’ प्रणालीशी जोडली जाणार असून त्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले आहे. ३० आॅक्टोबरपर्यंत देशभरातील सर्व पोलीस ठाणे एकमेकांशी आॅनलाईन झालेच पाहिजे अशी तंबी वजा आदेश केंद्र सरकारने काढले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजीटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यांचे डिजीटालायझेशन हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ‘विप्रो’ या आयटी कंपनीला कंत्राट दिला असून ही कंपनी देशभरात पोलीस ठाण्यांना सॉफ्टवेअर पुरवित आहे. जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षक तर आयुक्तलयाच्या स्तरावर पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली संगणक शाखा व सायबर शाखेच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. 

१९९८ या वर्षापासूनचा डेटा संगणकात समाविष्ट 

जळगाव जिल्ह्यात २०१५ पर्यंतचा डेटा समाविष्ट झालेला आहे.  पोलीस ठाण्यांचे काम पेपरलेस होणार  ‘डिजीटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे पेपरलेस करण्याचा प्रयत्न केंद्रीय गृहमंत्रालयाचा आहे. त्याचाच भाग म्हणून पोलीस यंत्रणेसाठी ‘सीसीटीएनएस’ प्रणाली तर सामान्य नागरिकांसाठी सीटीजन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाला या पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या आपली तक्रार नोंदविणे असो की सामान्यांशी निगडीत माहिती या पोर्टलवर मिळत आहे.  

पोलिसांचे काम अधिक सोपे   

सायबर कक्षाच्या एका अधिकाºयाच्या मते हे काम करताना सध्या प्रचंड त्रास होत असला तरी त्याचे दूरगामी परिणाम मात्र खूप चांगले असणार आहेत. एखाद्या आरोपीची माहिती काढायची असेल तर तो राहत असलेल्या क्षेत्राच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करुन माहिती घ्यावी लागत होती. यासाठी वेळ, मनुष्यबळ व खर्चाचा विषय येत होता. आता मात्र गुन्हगाराचे नाव संगणकावर क्लिक केले की त्याची कुंडलीच समोर येईल. त्या गुन्हेगारावर देशभरात कुठे, किती व कोणते गुन्हे दाखल आहेत तसेच त्याची सद्यस्थिती जसे की तो कारागृहात आहे, पोलीस कोठडीत आहे किंवा जामीनावर आहे याची अद्ययावत माहिती लागलीच मिळू शकणार आहे. त्यामुळे पोलिसांचे काम अतिशय सोपे होणार आहे.