शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुडी येथे दूषित पाण्यातून ९० जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 20:43 IST

मुडी प्र.डा., ता.अमळनेर : मुडी येथे मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यातूनच गावातील सुमारे ...

मुडी प्र.डा., ता.अमळनेर : मुडी येथे मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यातूनच गावातील सुमारे ९० जणांना पोटदुखी व हगवणीची लागण झाली आहे.मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकाने गावात भेट देऊन पाहणी केली. त्यात ठिकठिकाणी गटारी फुटलेल्या, पिण्याच्या पाईपलाईन गळक्या असून तेथेच गटारी आढळून आल्या. गावातील जवळपास ८० ते ९० जणांना हगवण व पोटदुखीचा त्रास होत आहे. काही रुग्ण खासगी दवाखान्यात, तर काही मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. काही बेटावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे येथे दाखल होऊन उपचार घेत आहेत. रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी केली असता गावविहिरीलगत असलेले व्हॉल्व्ह लिकेज आढळून आले. गावात पाणी पुरवठा करणारी येणारी मुख्य पाईपलाईन लिकेज आहे. गटारीचे पाणी पाईपलाईनच्या शुद्ध पाण्यात मिसळून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. आरोग्य विभागाने ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. त्यात सर्व नळांना तोट्या बसवून , व्हॉल्व्ह गळती बंद करून पाण्याच्या टाकीजवलील कचरा स्वच्छतेचे निर्देश दिले आहेत.ही गंभीर बाब असून ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामसेवकाचे दुर्लक्षगावात साथरोगाची लागण झाली आसताना ग्रामसेवक मात्र जळगावी येथे वास्तव्यास जाऊन बसले आहेत. आठवड्यातून एक ते दोन दिवस ते हजेरी लावून परत निघून जातात, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली.