शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

देशी तुपाचा धावता ट्रक ‘लुटला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:20 IST

कुसुंबा शिवारातील घटना : एक लाख 60 हजार 80 रुपये किमतीच्या देशी तुपाचे 29 डबे लंपास

रावेर : पाल ते रावेर या रस्त्यावरील खड्डय़ांच्या दैनावस्थेत खड्डे चुकवण्यासाठी कमी वेग झालेल्या ट्रक क्र.(जे.के.-21/4967) ची ताडपत्री व फट फाडून अज्ञात तीन चोरटय़ांनी धावत्या ट्रकमधून जीआरडी कंपनीचे प्रत्येकी 15 किलो वजन व पाच हजार 520 रुपये किंमत असलेले देशी तुपाचे 29 डबे असलेला एक लाख 60 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा ते लालमाती दरम्यान कुसुंबा शिवारातील  दर्गाहजवळ घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पौष पौर्णिमेनिमित्त कुसुंबा खु.।। येथे भवानी माता मंदिरात आज होत असलेल्या यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला रस्तालुटीची ही घटना घडल्याने परिसरात एकच घबराहट पसरली आहे. याप्रकरणी  पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू जिल्ह्यातील कटवा येथील ट्रकमालक व चालक असलेले चंद्रशेखर ओमप्रकाश शर्मा (रा.तारानगर, हटेलीमोट, कटवा) हे त्यांच्या ट्रक (क्र.जे.के.21/4967) ने जम्मूहून बंगलोरच्या पुढे असलेल्या हाफर येथे जीआरडी कंपनीचे उत्पादन असलेले 15 किलो वजनाचे देशी तुपाचे डबे भरुन नेत होते. दरम्यान, पालकडून रावेरकडे येत असताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे खड्डे चुकवत त्यांच्या ट्रकचा वेग कमी होताच अज्ञात चोरटय़ांनी ट्रकवर चढून वरच्या बाजूने फट व ताडपत्री कापून प्रत्येकी 15 किलो वजन व किंमत पाच हजार 520 रुपये असलेले 29 डबे धावत्या ट्रकमधून लंपास केले.  सुमारे 41 क्विंटल 35 किलो वजनाचे एक लाख 60 हजार 80 रुपये किमतीचा देशी तुपाचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी लुटला. ही घटना बुधवारला रात्री 8.30 वाजेच्या सुमारास लालमाती-कुसुंबा दरम्यान कुसुंबा शिवारात असलेल्या दर्गाहजवळ घडली. पौष पौर्णिमेनिमित्त कुसुंबा खु.।। येथील श्री भवानी माता मंदिरात असलेल्या यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी   पोलिसात चंद्रशेखर ओमप्रकाश शर्मा (रा.तारानगर कॉलनी, हटेलीमोर, कटवा, जि.जम्मू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार ज्ञानेश फडतरे हे करीत आहेत. (वार्ताहर)खड्डय़ांमुळे  घडली घटना..रावेर तालुक्यातील पाल-रावेर हा रस्ता अती खड्डेमय आहे.या खडय़ांवरुन तूप घेऊन जाणा:या ट्रकची गती अतिशय धीमे होती.याच संधीचा फायदा चोरटय़ांनी घेतला. मालट्रकवरील ताडपत्री फोडून त्यांनी ट्रकमधील एक लाख 60 हजार रुपये कितीचे 29 तुपाचे डबे लांबवून पलायन केले.या घटनेला केवळ रस्त्याची दुरवस्था कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.