शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला

By admin | Updated: March 2, 2017 00:19 IST

सुधीर कुमार गुप्ता : एकत्र अर्थसंकल्पामुळे रेल्वेतील प्रकल्पांना निधी मिळेल

भुसावळ : सरकारच्या  वन नेशन वन बजेटमुळे रेल्वेच्या सुमारे पाच हजार ४०० कोटी रुपयांची बचत झाली आहे शिवाय एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्पांना पुरेसा निधी मिळेल व प्रकल्प पूर्ण होतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता यांनी  बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला असून भुसावळ रेल्वे विभागाने या क्षेत्रात चांगले काम केले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नाशिक येथील इरीन प्रकल्पात ३० केव्ही पॉवर, भुसावळ रेल्वे स्थानक दहा आणि भुसावळ येथील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत ५०० केव्ही पॉवरचे सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहे.एलईडी दिव्यांचा वापरभुुसावळ येथील रेल्वे स्थानकावर पूर्णपणे एलईडी दिव्यांचा झगमगाट आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरही ८० टक्के असे दिवे बसविण्यात आले आहे. नाशिक ते इगतपुरी पर्यंत एलईडी करण्यात आले आहे. पुढे ते मनमाड पर्यंत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.भुसावळ-जळगावात लिफ्टदेशातील ५०० रेल्वे स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकते जिण्यांची सोय राहील, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले भुसावळ विभागातील भुसावळ-२, नाशिक २,मनमाड-२, जळगाव-२, अकोला-२  व खंडवा- २ या प्रमाणे लिफ्टची सोय करण्यात आली आहे. अपूर्ण कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील.गुप्ता यांनी यावेळी २०२० पर्यंत मुख्य रेल्वे मार्गावर मानवरहित गेट बंद करण्यात येतील. भुसावळ विभागात केवळ खामगाव,जलंब या ठिकाणी तीन गेट आहेत. २०१७-१८ पर्यत देशातील ५०० रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.यात भुसावळ रेल्वे विभागातील एकाही स्थानकाचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. एसएमएस प्रणालीवर क्लीन माय कोच सर्व्हीस याबाबतही त्यांनी माहिती दिली. एक खिडकी योजने अंतर्गत कोच मित्र सुविधेची त्यांनी माहिती दिली. त्यांनी रेल्वेतील पार्सलसह विविध सेवांमध्ये ९९.९ टक्के व्यवहार धनादेशाद्वारे होत असल्याचे सांगितले. एडीआरएम अरुण धार्मिक,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एन. पिंपरीकर, सीनिअर डीईएन ए. के. सिंग, अरविंद कुमार, सिनिअर डीएमई दिनेश गजभिये, सिनिअर डीएफएम  विजय कदम, सिनिअर डीईई नरहरी निमजे, डीसीएम व्ही.पी.दहाट,एसीएम अजयकुमार, विजयकुमार पालवे आदी अधिकारी उपस्थित होते.रेल्वे अर्थसंकल्पाची  परंपरा खंडित४भारतीय रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची १९२० पासूनची परंपरा २०१७ मध्ये थांबल्याची माहिती डीआरएम गुप्ता यांनी यावेळी दिली.रेल्वेचा सहभाग जास्त असल्याने १९२० पासून वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात होता.आता एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्प पूर्ण होतील.