लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुपोषित बालकांची संख्या तिपटीने वाढल्याचे समोर आल्यानंतर आता या बालकांचा विशेष आहार हा प्रस्तावात अडकला आहे. अद्याप या आहाराचा पुरवठा होण्यास आठ दिवसांचा अवधी आहे. दुसरीकडे जून महिन्याच्या संख्येनुसार कुपोषित बालकांना नियमीत आहार देण्यात येत असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत यांनी अंगणवाडी स्तरावरील रिक्त पदांचा आढावा घेतला. यात २०४ पदे रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑगस्ट महिन्यात पुन्हा कुपोषणाचा सर्व्हे करण्यात आला असून ३१ रोजी हा अहवाल प्राप्त होणार असून ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
असा मिळतो प्रतिदिन आहार
चना दाळ ३० ग्राम
मुग दाळ २० ग्राम
गहू ८० ग्राम
मिरची पावडर ४ ग्राम
हळदी पावडर ४ ग्राम
मिठ ८ ग्राम