शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

मन वढायं.. वढायं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 23:52 IST

मानवी मन मोठं अथांग आहे. प्राचीन काळात या ऋषीमुनींपासून आजच्या मानसशास्त्रांपर्यंत सर्वांनीच आप-आपल्यापरीने मनाचं स्वरुप समजावून घेण्याचा, विशद करण्याचा ...

मानवी मन मोठं अथांग आहे. प्राचीन काळात या ऋषीमुनींपासून आजच्या मानसशास्त्रांपर्यंत सर्वांनीच आप-आपल्यापरीने मनाचं स्वरुप समजावून घेण्याचा, विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही मनाचे नेमके स्वरुप कुणाला आकलन झालेले नाही. मनाला इंद्रियांचा राजा म्हणतात. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मोंद्रिये ही १० इंद्रिये ज्याच्या इशाऱ्यावर काम करतात ते मन हे अकरावे इंद्रिय मानले गेले आहे. इतर इंद्रियांना दृश्यरुप आहे. आकार आहे, ज्याचे त्याचे निश्चित असे स्थान आहे. पण आपल्या शरीरात मन नेमके कुठे ठेवले आहे? त्याचा आकार स्वरुप कसा आहे? संत ज्ञानेश्वर महाराज या मनाबद्दल निरुपण करताना म्हणतात ‘हे मन कैसे केवढे । पाहो म्हणो तरी न सापडे । परी राहाटावया धोकडे । त्रैलोक्य इया ।। ‘पाहू गेलो तर दिसत नाही. सर्वत्र फिरत मात्र असतं. त्याचा स्वभाव मात्र चंचल आहे. एका जागी स्थिर राहत नाही. एका विषयात रमत नाही. मन चपय चपय याची काय सांगू मात । आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात । असं त्याचं वर्णन बहिणाबाई करतात. इंद्रियांना विषयामागे धावायला मनच भाग पाडतं. मन कधी कृती करत मग शरीराकडून ती कृती पूर्ण होते. मनात सतत विविध संकल्प विकल्पाची उलथापालथ सुरू असते. म्हणूनच महर्षी पतंजलींनी ‘संकल्प विकल्पात्मक मन’ अशी मनाची व्याख्या केली आहे. तसे मन भोगत काहीच नाही. मानवी सुख-दुखाचे एकमेव कारण ही मनच आहे. मनके मारे हार है... मन के मारे जीत । मन ही मिलाय रामको मन करे फजित । असे मनाचे वर्णन कबीरांनी एका दोह्यात केलेले आहे. शास्त्रकारांनी माणसाच्या बंधमोक्षाचे कारण मनच आहे असे सांगितले आहे.मन एवं मनुष्यवाणी कारण बंध मोक्षय ।। अशा या चंचल मनाला स्थिर कसे करता येईल? माकडाची कधी समाधी लागू शकेल काय? हे कैसे घडेल का मर्कट समाधी येईल? असा प्रश्न माऊली विचारतात. गीतेच्या सहाव्या अध्यायास अर्जूनाचा श्रीकृष्णाशी या विषयावर मोठा गोड संवाद झाला आहे. मन चंचल खरेच पण अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनांनी ते निश्चित स्थिर होईल. काबूत येईल असे भगवंत सांगतात. मन एकदा स्थिर झाले की मग सुखाच्या कोठाराची चाबी सापडलीच समजा. संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।आज प्रत्येक जण ताण-तणावाखाली आहे. परंतु त्याकडे निकोप दृष्टीने पाहण्याची गरज आहे. मनाच्या स्वास्थासाठी ध्यानाचा उत्तम उपाय ऋषीमुनींनी सांगितला आणि नामस्मरणाचा सोपा मार्ग संतांनी सांगितला. एकदा नामाची गोडी लागली ती सुटत नाही. लाचावले मन लागली से गोडी । ते जीवे न सोडी ऐसे झाले । मग सर्व समस्या सुटत असतात.-प्रा.सी.एच.पाटील, धरणगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव