शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जलपातळी वाढण्यासाठी नद्यांचे लोकसहभागातून खोलीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 19:25 IST

यावल तालुक्यातील डांभुर्णी, उंटावद, दोनगाव परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभागातून परिसरातील नद्यांचे खोलीकरण सुरू झाले असून यासाठी शेतकऱ्यांनी हिरीरीने पुढकार घेतला आहे.

ठळक मुद्दे डांभुर्णी परिसरातील शेतकरी एकवटले लोकवर्गणी जमा करून नद्यांच्या नांगरटीला सुरूवात कार्यस्थळी शेतकºयांसह तरुणांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतडांभुर्णी, ता. यावल, दि.१० : डांभुर्णी, उंटावद, दोनगाव शिवारातील नद्यांचे खोलीकरण करण्यासाठी डांभुर्णी येथील शेतकºयांनी एकत्रीत येऊन नांगरटी सुरू केली असून या उपक्रमाचा फायदा पावसाळ्यात भूगर्भातील जलपातळी वाढण्यात होणार आहे.डांभुर्णी येथील शेतकºयांनी लोकसहभागातून वर्गणी गोळा करून गावातील दोन्ही बाजुच्या नदीवर नांगरटीस रविवारपासून सुरुवात केली.सातत्याने घटणाºया जलपातळीत वाढ होण्याच्या संदर्भात डांभुर्णी गावातील मढी येथे नुकतीच चर्चा करुन लोकांनी पुढाकार घेऊन ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेसह जलसंधारण कामाकरिता लोकवर्गणी जमा केली. या करीता डॉ. विवेक चौधरी, सरपंच पुरुजीत चौधरी, ग्रा.पं. सदस्य संजीव कोळी, बाळू पाटील यांनी आपले स्वत:चे विनामोबदला ट्रॅक्टरसह वर्गणीही दिली. तर समाधान कोळी, विजय कोळी, लढे, प्रविण भंगाळे, पिंटु भंगाळे, गोकुळ कोळी, महेश पाटील , किरण कचरे, भोजराज फालक, निलेश चौधरी, मनोज पाटील, विकास भंगाळे, डॉ. प्रशांत भंगाळे, विजय भंगाळे, चेतन सरोदे, जितू मेंबर, सतीश नारखेडे आदींनी लोकवर्गणी जमा करून नद्यांच्या खोलीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.बेसुमार उपशामुळे दरवर्षी भू गर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात असून उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. त्यावर उपाययोजना म्हणून पाण्याची साठवण करून भविष्यात शेतीसाठीदेखील पाण्याची अडचण भासू नये, यासाठी गावातून जाणा-या नाल्यालाही नांगरण्याचे काम सुरू केले असून यामुळे नाल्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन ते पुढे जमीनीत जिरेल व परिसरातील खोल गेलेली पाण्याची पातळी काही प्रमाणात का होईना वर येईल. त्यामुळे भविष्यात बागायती शेती करणे सोपे होईल या विधायक उद्देशाने डॉ. विवेक चौधरी व शेतकºयांनी नद्यांच्या नांगरटीचे हे काम सुरू केले आहे.