शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील उद्योग वाढीसाठी अधिकाधिक वित्तपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:07 IST

आरबीआयचे निर्देश : आरबीआय एमएसएमई उच्चाधिकार समितीची बैठक जळगाव : राज्यातील उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना जास्तीत जास्त ...

आरबीआयचे निर्देश : आरबीआय एमएसएमई उच्चाधिकार समितीची बैठक

जळगाव : राज्यातील उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना जास्तीत जास्त वित्तपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला असून या उद्योगांसाठी अधिकाधिक वित्तपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे  निर्देश   गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यावतीने राज्यातील बँकांना दिले. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी मदत व्हावी म्हणून डिसेंबर अखेरच्या तिमाहित सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी एक लाख ९६ हजार ५७४ कोटी रुपयांचा अर्थपुरवठा केला गेला आहे. राज्यभरातील उद्योगांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी होणाऱ्या वित्तपुरवठा व या उद्योगांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात गुुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उच्चाधिकार समितीची ऑनलाईन बैठक झाली. यामध्ये या उद्योगांच्या स्थितीचा आढावा घेऊन अधिकाधिक वित्तपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक संगीता ललवाणी, वरिष्ठ संचालक अजय मिचिरिया, उच्चाधिकार समितीचे महाराष्ट्र-गोवा सदस्य संजय दादलिका (जळगाव), राज्याच्या उद्योग संचालक कार्यालय अधिकारी  यांच्यासह राज्यातील विविध बँकांचे तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे प्रमुख सहभागी झाले होते.कोरोनाच्या सावटाखाली उद्योगांची स्थिती पाहता  उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या वित्त पुरवठ्याची गरज असून या उद्योगांना अधिकाधिक वित्तपुरवठा व्हावा व सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशा प्रस्ताव राज्याचे उच्चाधिकार समितीचे सदस्य संजय दादलिका यांनी मांडला. त्याला तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आरबीआय प्रतिनिधींनी अधिकाधिक वित्त पुरवठ्याविषयी सूचना दिल्या. यामध्ये या उद्योगांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करुन देण्याविषयी राज्याकडे शिफारस केल्याची माहिती दादलिका यांनी दिली. यामुळे आता या उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या असून गेल्या वर्षी लॉकडाऊन काळातील बसलेल्या झळांमधून सावरण्यासही मदत होणार असल्याचा विश्वास उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.राज्यातील अनेक बँकांमध्ये मोठ्या खात्यांची थकबाकी वाढल्याने ती नियमित करण्यासाठी आरबीआयने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या वेळी दादलिका यांनी केली. यात ही खाते नियमित झाल्यास ते मंदीतून सावरू शकतील, असेही त्यांनी सूचविले.

टॅग्स :Jalgaonजळगाव