जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजनेच्या याद्यांचा घोळ वर्ष होत आले तरीही सुरूच आहे. रावेर येथील २५ शेतकरी पूर्ण दीड लाख कर्जमाफीसाठी पात्र असताना त्यांचे नाव मात्र वन टाईम सेटलमेंटच्या यादीत आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर यादीत दुरुस्तीची प्रक्रिया करूनही आजपर्यंत हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असल्याने या शेतकºयांनी गुरूवार, ५ एप्रिल रोजी जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा बँक कार्यकारी संचालकांना निवेदन देऊन गाºहाणे मांडले.शासनाने कर्जमाफी योजनेची घोषणा केल्यापासून ही योजना वादात सापडली आहे. पात्र शेतकºयांच्या याद्यांमध्ये अनेक घोळ आढळून आले आहेत. रावेर येथील २५ शेतकºयांचे नाव कर्जमाफीच्या तिसºया यादीत आले. मात्र त्यात हे शेतकरी पूर्ण दीड लाखांच्या कर्जमाफीस पात्र असताना वन टाईम सेटलमेंटच्या यादीत समाविष्ट असल्याचे आढळून आले. त्यामुळे या शेतकºयांनी सहकार विभागाकडे तक्रार केल्यावर दुरुस्ती करून माहिती पाठविण्यात आली. मात्र अद्यापही त्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आलेले नाही. अखेर चिडलेल्या या शेतकºयांनी गुरूवारी जिल्हा बँकेत जाऊन तेथील अधिकाºयांना विचारणा केली. त्यांनी ही प्रक्रिया सहकार विभाग राबवित असल्याचे सांगितल्याने जिल्हा उपनिबंधकांचीही भेट घेऊन निवेदन दिले. या शेतकºयांमध्ये कैलास महाजन, पूनम महाजन, संदीप महाजन, गिरीश पाटील, भास्कर कुंभार, शेख शरीफ शे. रमजान, शे.तैय्यब शे.रमजान, संजय चौधरी, संगीता महाजन, मदन महाजन, अशोक शिंदे, अजय लोणारी, ज्योतीबाई महाजन, जगन्नाथ महाजन, शे. कौसर शे. अजगर, सोमनाथ खंगार, गोपाल लोणारी, कबीरूद्दीन गयासुद्दीन, अर्जुन चौधरी, पद्माकर महाजन, बन्सी लोणारी, नरेंद्र महाजन, साबीराबी सलीम, मधुकर भोगे, भास्कर पाटील यांचा समावेश आहे.----आठव्या यादीत नाव येईलयाबाबत जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या शेतकºयांची सुधारीत माहिती शासनाकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे आठव्या यादीत (ग्रीनलिस्ट) या शेतकºयांची नावे येण्याची शक्यता आहे.
पूर्ण कर्जमाफीऐवजी ओटीएसच्या यादीत समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:04 IST
कर्जमाफी यादीत घोळ सुरूच
पूर्ण कर्जमाफीऐवजी ओटीएसच्या यादीत समावेश
ठळक मुद्दे रावेरच्या २५ शेतकऱ्यांची तक्रार आठव्या यादीत नाव येईल-डीडीआर