शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यावल तालुक्यावर ‘प्रभारी राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 16:10 IST

यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयांमध्ये अनेक महत्त्वाची पदे रिक्तमंजूर विविध पदांपैकी ८० टक्के पदे रिक्तसांगायला दोन आमदार, तरीही तालुक्याकडे दुर्लक्षयास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रनिधिंची उदासीनता कारणीभूततालुकावासीयांकडून उपस्थिततालुक्याचा विकास ठप्पसर्वसामान्य नागरिकांची कामे होईना

डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे व सर्वसामान्यांच्या विकासासाठी व सुरक्षेसाठी असलेले पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका येथे गेल्या अनेक वर्षांपासून ‘प्रभारी राज’ असल्याने तालुक्याचा विकास ठप्प झाला आहे.यावल तालुका हा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. साहजिकच तालुक्यास दोन आमदार लाभले आहेत. दोन आमदार असताना तालुक्यातील या महत्त्वाच्या कार्यालयास कोणीही ‘वाली’ नसल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे की, यास तालुकावासींची सहनशिलता कारणीभूत आहे की लोकप्रतिनिधींची उदासीनता?ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदूग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेले व मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या येथील पंचायत समितीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून गटविकास अधिकारी नाही. पंचायत समितीचे कामकाज सुरू दिसत असले तरी सक्षम अधिकारी नसल्याने ‘आव-जाव घर तुम्हारा है’ अशी गत आहे. यात मात्र ग्रामस्थांची हेळसांड होत आहे.तालुका कृषी कार्यालययेथील विरावली रस्त्यावरील शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुका कृषी कार्यालयाचे कामकाज तर ‘रामभरोसे’च सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त आहे . दुय्यम अधिकारी म्हणून असलेल्या तीनही मंडळ अधिकारी पदांसह अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत.कार्यालयातील सूत्रांनुसार, मंजूर विविध पदांपैकी ८० टक्के पदे रिक्त आहेत. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील या कार्यालयात शेतकरी केव्हाही गेल्यास कार्यालयातील मोजके कर्मचारी सोडल्यास सर्व टेबल्स रिक्तच दिसतात. शेतकऱ्यांच्या विविध योजनांची माहिती मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.पोलीस ठाणेगेल्या दीड महिन्यापासून येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी यांची मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. दुय्यम अधिकारी सुजीत ठाकरे यांचीही गेल्या १५ दिवसांपासून बदली झालेली आहे. मात्र ‘प्रभारी अधिकारी’ नसल्याने ते थांबून आहेत. शहरासह हद्दीत अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले. स्थानिक पोलीस सर्व आॅलवेल सांगत असले तरी स्थानिक गुन्हे अन्वेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून मधून-मधून विविध ठिकाणी छापे, अवैध व्यावसायिकांवर मारले जातात. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार चालत असल्याचे नागरिकांत चर्चा आहे.ग्रामीण रुग्णालययेथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे प्रथमोपचार केंद्र आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालस अधीक्षक लाभलेले नाहीत, तर वैद्यकीय अधिकाºयांची सर्वच पदे रिक्त आहेत. फिरत्या आरोग्य पथकाच्या डॉॅक्टरांकडून दररोज बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. वेळेनंतर रुग्णांवर येथे केवळ प्रथमोपचार करून त्यांना जळगावला पाठवण्यात येते. ग्रामीण रुग्णालयाला अनेक वर्षांपासून स्थायी अधिकारी मिळू नये, यापेक्षा आणखी दुर्दैव कोणते असू शकते, असा प्रश्न यावल तालुकावासीयांमधून उपस्थित करण्यात येत आहे.नगरपालिकायेथील नगरपालिकेचीही तीच गत आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांपासून येथे मुख्याधिकारी नाही. रावेर पालिकेचे मुख्याधिकारी आर.एस.लांडे यांच्याकडे यावल पालिकेचा अतिरिक्त पदभार आहे. पालिकेला नियमित मुख्याधिकारी नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. नागरिकांची दैनंदिन कामे त्यामुळे खोळंबून पडत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.शहरासह सर्व तालुकास्तरीय कार्यालयाचीच ही गत झाली आहे. सर्व कार्यालयांचे बाहेरील अधिकारीच ‘प्रभारी’ आहेत. बाहेरील तालुक्यास अधिकारी भेटतात. मग आपल्याच तालुक्यास का नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत यास तालुकावासीयांची सहनशिलता की लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे, असा कोडे न उलगडणारा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारYawalयावल