भालोद, ता. यावल : येथील दूध उत्पादक सोसायटीच्या नवीन उपशाखेचे उद्घाटन चिखली दरवाजा येथे जिल्हा बँक संचालक गणेश नेहेते यांच्या हस्ते ३१ रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण शशिकांत चौधरी होते. या भागातील दूध उत्पादकांना दूध संकलनासाठी व ग्राहकांना सोयीचे व्हावे यासाठी दूध उत्पादक सोसायटीच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याचे संस्थेचे चेअरमन संजय भागवत ढाके यांनी सांगितले.
याप्रसंगी दूध उत्पादक सोसायटीचे संचालक हेमचंद्र इंगळे, पितांबर इंगळे, अशोक महाजन, शरद परतणे, नीळकंठ चौधरी, देवेंद्र नेहते, सरपंच प्रदीप कोळी, उपसरपंच कामिनी जावळे, वि. का. संस्थेचे चेअरमन मनोज जावळे, ग्रा. पं. सदस्य अमोल महाजन, प्रवीण परतणे, विद्या चौधरी, लीना नेहेते, प्रतिभा कुंभार, माजी सरपंच तुषार कुरकुरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सरपंच अरुण चौधरी यांनी केले. माजी उपसरपंच ग्रा. पं. सदस्य जाबीरखान समशेरखान, दूध संस्थेचे सचिव व कर्मचारी उपस्थित होते.