शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे भरड धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 17:24 IST

शासनाकडून तालुका शेतकी सहकारी संघाद्वारे तहसील गोडावूनमध्ये भरडधान्य केंद्राचा शुभारंभ माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला.

ठळक मुद्दे१० डिसेंबरपासून कुºहा येथे मका व ज्वारीची होणार खरेदी३१ डिसेंबरपर्यंत असेल खरेदीचा कालावधीहस्तलिखीत उतारे स्वीकारण्यात येणार नाहीत

मुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्य शासनाकडून तालुका शेतकी सहकारी संघाद्वारे तहसील गोडावूनमध्ये भरडधान्य केंद्राचा शुभारंभ माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला. १० डिसेंबरपासून कुºहा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा मका व ज्वारी यांची मोजणी केली जाणार आहे.शासकीय खरेदी केंद्रांवर भरडधान्य विक्री करावयाची असेल तर आॅनलाइन नोंदणी आवश्यक आहे. आतापर्यत तालुक्यातील २३८ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे . मका हेक्टरी ३३ क्विंटल व ज्वारी हेक्टरी १५ क्विंटल अशा मर्यादेत मोजली जाणार आहे. हायब्रीड ज्वारीचा २४३० रुपये व मका १७०० रुपये हेक्टरी घेण्यात येणार आहे. सोमवारपासून शेतकºयांंनी ज्वारी, मका मोजणीसाठी आणावा, असे शेतकी संघाचे चेअरमन प्रभाकर झोपे यांनी सांगितले. या वेळी तहसीलदार श्याम वाडकर, जिल्हा परिपद सदस्य नीलेश पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, पंचायत समिती सभापती विकास पाटील, समाधान कारले, दशरथ कांडेलकर, शेतकी संघाचे चेअरमन प्रभाकर झोपे, व्यवस्थापक रतीराम सपकाळे उपस्थित होते.शेतकरी बांधवांना मका विक्री करायची असेल त्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी व खरेदी वेळी पिकाची नोंद असलेला आॅनलाईन सातबारा उतारा आवश्यक आहे. हस्तलिखीत उतारे स्वीकारण्यात येणार नाहीत तर ३१ डिसेंबरपर्यत खरेदीचा कालावधी असेल, असे शेतकी संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे.