शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

पारोळा बाजार समितीत १०० बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 21:06 IST

पारोळा येथे महिनाभरात ऑक्सिजन प्लांट सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चव्हाण यांनी दिली.

रावसाहेब भोसलेपारोळा : जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसिविर २५ हजार इंजेक्शन व २० हजार लसींचा डोस दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. तसेच पारोळा येथे कुटीर रुग्णालयात एक ते दीड महिन्याच्या आत ऑक्सिजन प्लांट उभा राहणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजी चव्हाण यांनी दिली.पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० बेडच्या कोविड केयर सेन्टरच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.यावेळी सभापती अमोल पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष चतुर पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, गटविकास अधिकारी एन.आर.पाटील, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० बेडमध्ये २५ ऑक्सिबेड व ७५ नॉन ऑक्सिबेडचे हे कोविड केयर सेन्टर राहणार आहे. या ठिकाणी औषधी, ऑक्सिजन सिलेंडर व पारोळा येथील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नर्स हे वैद्यकीय सेवेसाठी पुरविले जातील. डॉक्टर, परिचारिका यांच्या नियुक्तीचे नियोजन करून त्याप्रमाणे आदेश त्यांना देण्यात येतील, असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले. या कोविड सेन्टरसाठी तत्काळ १० ऑक्सिसिलेंडर त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथून उपलब्ध करून दिलेत.तसेच शासनाकडून ज्याप्रमाणे रेमडेसिविर, लसी व औषधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्याप्रमाणे खाली कुटीर रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरविली जातात. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून साठा शिल्लक नाही. पण दोन दिवसात जिल्ह्यासाठी २५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन, २० हजार लसी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता सर्व ठिकाणी मुबलक इंजेक्शन लसी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.पारोळा कुटीर रुग्णालयात एक दीड महिन्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होणार आहे. दररोज १०० सिलिंडर एवढे ऑक्सिजनची निर्मिती या प्लांटमधून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीत कोविड सेन्टर सुरू झाल्याने गरीब, गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होईल, असे यावेळी त्यांनी बोलून दाखविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParolaपारोळा