शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

संतप्त शेतकºयांचा तहसीलदारांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 00:14 IST

जामनेर : तूर खरेदी केंद्रावर संथगतीने काम, अधिकाºयांसमोर मांडले गाºहाणे

जामनेर : नाफेडच्या ग्रेडरअभावी ठप्प झालेली येथील तूर खरेदी बुधवारी दुपारी सुरू झाली, मात्र हमालांची कमतरता व मोजणीसाठी असलेला एकमेव काटा यामुळे खरेदी संथगतीने सुरू आहे. दरम्यान, तूर खरेदी केंद्रावर माहिती घेण्यासाठी आलेल्या नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांना संतप्त शेतकºयांनी घेराव घालून गाºहाणे मांडले.नाफेडचे ग्रेडर आले तरच खरेदी करू, अशी आडमुठी भूमिका शेतकरी संघाने घेतल्यामुळे खरेदी बंद पडल्याने शेतकºयांचे हाल सुरू आहेत. बुधवारी नाफेडचे ग्रेडर आनंद वाघ केंद्रावर आले. सद्य:स्थितीत बाजार समिती आवारात सुमारे चार हजार क्विंटल तूर असून, आठ दिवसांपासून खरेदीसाठी शेतकरी थांबून आहेत.तुरीची आवक जास्त व दिवसभरात मोजणी अत्यंत संथगतीने होत असल्याने वेळ लागत आहे. मोजणीसाठी शेतकरी संघाने  काटे वाढवावेत व हमालांची संख्यादेखील वाढवावी, अशी मागणी उपस्थित शेतकºयांनी केली.बुधवारी सकाळीच केंद्रावर     ग्रेडर आले. मात्र खरेदीच सुरू          होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अशातच महिला    दिनाच्या कार्यक्रमासाठी जात  असलेले नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांच्या गाडीला थांबवून शेतकºयांनी त्यांना घेराव घातला        व त्यांच्यासमोर आपले गाºहाणे मांडले.बाजार समिती आवारात असलेल्या गोडाऊनपैकी फक्त एकच गोडाऊन शेतकरी संघाला तुरीचे पोते ठेवण्यासाठी देण्यात आले आहे. पोत्यांनी भरल्यानंतर खरेदी केलेली   तूर कोठे ठेवावी, अशी समस्या असल्याने पुन्हा काही काळ खरेदी थांबविली जाते. यासाठी बाजार समितीने जास्तीचे गोडाऊन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.सहा ते आठ दिवसांपासून थांबल्याने ट्रॅक्टरचे भाडे वाढत असल्याने शेतकºयांनी उघड्यावर तुरीचे पोते ठेवले आहेत. आवारात फिरणाºया डुकरांचा शेतकºयांना त्रास होत असून, तुरीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी केल्या.शासकीय तूर खरेदी केंद्रावर  ग्रेडरअभावी ठप्प झालेली तूर खरेदी आजपासून नियमित सुरू झाली असून, नाफेडचे ग्रेडर नियमित येऊन खरेदी करतील. शेतकºयांच्या समस्या ऐकून घेतल्या. मोजणीसाठी जादा काटे व हमाल संघाने पुरवावेत यासाठी त्यांच्याशी संपर्क करीत आहोत. -परमेश्वर कासुडे, नायब तहसीलदार, जामनेर