शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना! चिमुकला पाणी प्यायला गेला अन् तिथे चुलत भावाचा मृतदेह दिसला

By विजय.सैतवाल | Updated: October 6, 2023 14:33 IST

वडील उत्तरप्रदेशात आणि आई शेतात कामाला गेली असताना तरुणाची आत्महत्या 

जळगाव - स्वयंपाकी असलेले वडील उत्तरप्रदेशात व आई शेतात कामाला गेलेली असताना लोकेश विलास अत्तरदे (२३, रा. विठ्ठलपेठ) या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास १० वर्षीय चिमुकला घरात पाणी पिण्यासाठी गेला त्या वेळी त्याला चुलत भाऊ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला व ही घटना उघडकीस आली. 

लोकेश याचे शिक्षण झाल्यानंतर तो कंपनीत काम करीत होता. त्याची आई शेती काम करते, बहीणीचे लग्न झाले असून वडील विलास अत्तरदे हे स्वयंपाकी आहे. ते उत्तरप्रदेशात लखनौ येथे स्वयंपाकी कामासाठी गेलेले आहे. शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेली होती. त्या मुळे तो घरात एकटाच होता. त्या वेळी त्याने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास या तरुणाचा १० वर्षीय चुलत भाऊ घरात लोकेशकडे पाणी मागण्यासाठी गेला त्या वेळी त्याला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला पाहताच चिमुकल्याने शेजारच्या मंडळींना ही घटना सांगितली. शेजारील काही तरुणांनी लोकेशला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. 

वडील येण्याची प्रतीक्षाया घटनेविषयी नातेवाईकांनी लोकेशच्या वडिलांना माहिती दिली. ते लखनौ येथून आल्यानंतर शनिवारी मयताचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. लोकेशला एक बहीण असून तिचे लग्न झाले आहे. एकुलत्या एक मुलाने टोकाचा निर्णय घेत जीवन संपविल्याने अत्तरदे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.