शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

मागील वर्षीची चूक सुधारून प्रशिक्षणाला दर्जेदार माणसे पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:44 IST

राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ

ठळक मुद्दे पानी फाऊंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धेसाठी कार्यशाळा चित्रफितीने भारावले उपस्थित मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठा

जळगाव: दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी मागील वर्षी केले त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून, अधिक जोमाने काम करा. जिल्ह्यात मागील वर्षी जी चूक झाली ती सुधारून यंदा अधिक दर्जेदार व या कामाची मनापासून आवड असलेल्यांनाच प्रशिक्षणासाठी पाठवा, असे आवाहन आमिरखानच्या पानी फाऊंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे राज्य समन्वयक डॉ.अविनाश पोळ यांनी केले. या स्पर्धेंतर्गत राज्यातील पहिली कार्यशाळा गुरूवार, १३ डिसेंबर रोजी जळगावातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिरात दुपारी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा अधिक्षक कृषी  अधिकारी संभाजी ठाकूर, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास गायकवाड, नाशिक जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले.चित्रफितीने भारावले उपस्थितयावेळी दुष्काळाशी दोन हात ही १७ मिनिटांची चित्रफित दाखविण्यात आली. त्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी कशा पद्धतीने आपसातील वाद, मतभेद मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना कसे यश मिळाले, हे दाखविण्यात आले. ते पाहून या कार्यशाळेला उपस्थित अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ भारावले.मागील वर्षी दोन तालुक्यात १०४ कोटी लिटर पाणीसाठापानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक गायकवाड यांनी मागील वर्षी अमळनेर व पारोळा या दोन तालुक्यांचा समावेश या योजनेत होता. त्याचा आढावा सादर केला. या दोन्ही तालुक्यात मिळून सुमारे १०४ कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला. त्यातून सुमारे २ लाख टँकर भरले जाऊ शकतील. तसेच त्याची बाजारभावानुसार किंमत १० कोटी रूपये असेल असे सांगितले.सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा बदलाडॉ.पोळ म्हणाले की, शिकून, ज्ञान घेऊन सरकारी खुर्चीत बसलेल्या अधिकाºयांकडे आपण जात नाही. कारण आपला सरकारी यंत्रणेकडे बघण्याचा चष्मा वेगळा आहे. मात्र आपण चांगल्या हेतूने गेलो तर यंत्रणा निश्चित मदत करते, हा माझा अनुभव आहे. माझी कोणतीही संस्था नाही. संत गाडगेबाबांचीही संस्था नव्हती. तरीही ते मंत्रालयात गेले तर मुख्यमंत्री उतरून खाली येत असत. ही त्यांच्या नैतिकतेची ताकद होती. दुर्देवाने ही ताकद निर्माण करण्यात आपण कमी पडतो. सरकारी यंत्रणेत खूप ताकद आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सरकारी यंत्रणेतील अधिकारी मित्रमंडळींच्या मदतीमुळेच बिबळेवाडी या सातारा जिल्'ातील गावात अनेक अडथळे पार करून महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, तसेच बायोगॅस युनिट उभारण्यात कसे यश मिळविले, याचा किस्सा उपस्थितांना ऐकविला.स्पर्धेचे निकषही सुधारीतडॉ.पोळ म्हणाले की, स्पर्धेचे निकषही यंदा सुधारीत केले आहेत. तसेच गेल्या वर्षी ७५ तालुक्यांचा समावेश होता. यंदा ७६ तालुक्यांचा समावेश केला आहे. केवळ जळगावसाठी हा बदल करून चाळीसगाव व जामनेर तालुक्यांचा समावेश केला  असल्याचे सांगितले.