शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात सुधारित जलवाहिनी योजनेला अखेर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 01:07 IST

सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध भागात नविन जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देचाळीसगाव पालिकेच्या स्थायी समितीच्या विविध विषयांवर चर्चा६२ कोटीची योजना, १५ लाख लीटर क्षमतेचा जलकुंभही उभारणार

चाळीसगाव, जि.जळगाव : सविस्तर प्रकल्प अहवालातील (डीपीआर) बहुचर्चित शहरांतर्गत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीसह नव्याने उभारण्यात येणाºया १५ लाख लीटर क्षमतेच्या जलकुंभ योजनेस पालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत अखेर मंजुरी देण्यात आली. यामुळे लवकरच शहराच्या विविध भागात नविन जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपनगराध्यक्ष आशाबाई चव्हाण यांच्यासह शविआचे गटनेते राजीव देशमुख, भाजपाचे गट नेते राजेंद्र चौधरी, आरोग्य सभापती रंजना सोनवणे, पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, बांधकाम सभापती चंद्रकांत तायडे, शिक्षण सभापती सूर्यकांत ठाकूर, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी सभेला उपस्थित होते.चाळीसगाव शहरासाठी असणारा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) यापूर्वीच मंजूर करण्यात आला असून, यातील काही योजनांना विरोध दर्शविण्यात आला होता. बुधवारी सकाळी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सुधारीत पाणीपुरवठा योजनेसह प्रदीपदादा नगर, महाराणाप्रताप नगरातील गटार व मटन मार्केट परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार असून ही सुधारीत पाणीपुरवठा योजना विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे वादाच्या भोव-यात सापडली होती. विरोधकांनी योजनेतील काही त्रुटी व उणिवांवर बोट ठेवले होते. २०५३ पर्यंतच्या लोकसंख्येचे उद्दिष्ट ठेऊन योजनेचा आराखडा असून आमदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने योजनेसाठी ६२ कोटी २० लाख रुपये मंजुरही केले आहे. यात शहरातील अंतर्गत जलवाहिन्या नव्याने टाकण्यासह अजून एक १५ लाख लटर क्षमतेचा जलकुंभही उभारला जाणार आहे. स्थायी समितीच्या सभेत योजनेला हिरवी झेंडी दाखविण्यात आल्याने योजनेतील अडथळा दूर झाला आहे.सुधारित पाणीपुरवठा योजनेत विरोधकांनी दाखविलेल्या त्रुटी दूर केल्या. शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही योजना स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली. योजनेमुळे आगामी काळात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची बचतही होणार आहे.- आशालता चव्हाण, नगराध्यक्षा, चाळीसगाव 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षChalisgaonचाळीसगाव