शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उत्खननात ढिगारा कोसळून दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 21:52 IST

निंभोरासीमची घटना : अन्य दोघे मजूर जखमी

रावेर : तालूक्यातील निंभोरासीम येथील तापी नदीच्या खोऱ्यातील अवैध वाळू वाहतुकीसाठी उत्खनन करतांना निंभोरासीम येथील युवा मजूर दीपक मोहन सवर्णे (वय २२) व नायगाव ता. मुक्ताईनगर येथील सुशांत सोपान मराठे (वय २०) हे सुमारे ४० ते ५० फूट उंचीवरून मातीचा ढिगारा कोसळून जागीच ठार झाले. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेत इतर दोघे जखमी झाले आहेत.ही दुर्घटना निंभोरासीम - मुक्ताईनगर कडे जाणाºया कच्च्या रस्त्यालगत घडली. सदर ढिगारा कोसळताच त्याठिकाणी उपस्थित असलेले गोपीचंद रघुनाथ सपकाळे यांनी आरडाओरड करून लगतच्या मजूर वस्तीतील लोकांना बोलवून ढिगारा उपसला असता समाधान मरू कोळी (वय २१) रा. निंभोरासिम व जितेंद्र कोळी रा. नायगाव (वय २२) हे दोघे जखमी अवस्थेत आढळले. त्यांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, नायगाव येथील मयताच्या आप्तेष्टांनी संबंधित वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकाकडून आर्थिक मदत मिळाल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भुमिका घेतल्याने तडजोडीअंती दुपारी तीन वाजेच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले.