शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पळवून नेलेल्या डंपरमधूनच अवैध गौणखनिजाची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 22:10 IST

दोन डंपर,एक जेसीबी पोलीस स्टेशनला जमा, सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देगलवाडे येथील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महसूलची कारवाईविकी ललवाणी याने उपविभागीय अधिकाºयाच्या परवानगिशिवाय डंपर पळवून नेले होतेपोलिसांना ते डंपर जमा करण्याचे पत्र दिले होते
आॅनलाईन लोकमत अमळनेर, जि.जळगाव, दि.३० : तहसील कार्यालयातून पळवून नेलेल्या डंपरद्वारेच पुन्हा अवैध गौणखनिज वाहतूक केल्याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला आज सायंकाळी सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध गौणखनिजाची वाहतूक करणारे दोन डंपर व एक जेसीबी मारवड पोलीस स्टेशनला जमा केले आहे.तालुक्यातील गलवाडे शिवारातून अवैधरित्या गौणखनिजची चोरी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे केली होती. त्यानंतर नायब तहसीलदार प्रशांत वाघ व गलवाडे येथील तलाठी पी.एस.पाटील घटनास्थळी गेले असता, विक्की ललवाणी याच्या मालकीचे विना क्रमांकाचे जेसीबी व डंपर (क्र.एमएच १८-एम.४६८५) तसेच बाळू नथ्थु कंजर (रा.ताडेपुरा) याच्या मालकीचे डंपर (क्र.एमएच १२-ईक्यू ८५०७) मधून अवैध गौणखजिन उत्खनन होत असल्याचे आढळून येताच, पथकाने तीनही वाहने जप्त केली. दरम्यान विक्की ललवाणीवर यापूर्वी दंडात्मक कारवाई झालेली असून, त्याने उपविभगाीय अधिकाºयांच्या परवानगीशिवाय तहसील आवारातून डंपर (एमएच१८-४६८५) पळवून नेले होते. पोलिसांना ते जमा करण्याचे पत्र देण्यात आले होते. तसेच त्याच्याविरूद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत. तर बाळू कंजर याचेही डंपर (एमएच १२-एस क्यू ८५०७) अवैध गौणखनिज प्रकरणी अमळनेर पोलिसात जमा करण्यात आले होते.मात्र त्याच डंपरमधून दोघेही पुन्हा अवैध गौणखनिज वाहतूक करतांना आढळून आले. याप्रकरणी तलाठी पी.एस.पाटील यांच्या फिर्यादीवरून डंपर मालक विकी सतीश ललवाणी (रा.समर्थनगर), बाळू कंजर, याच्यासह वाहनांचे चालक व सहकारी राजेंद्र भिकनराव वेळूसकर (नांद्री), दीपक निंबा शिरसाठ (पातोंडा), कैलास युवराज नेरकर (पैलाड), अशोक गुलाब धनगर (नंदुरबार) यांच्याविरूद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.