शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दापोरा हद्दीतून मुरुम व दगडाचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST

दापोरा ता.जळगाव : दापोरा येथील गट नं. २१० मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या मालकीचे क्षेत्र आहे. त्यातील मुरुमाचे, तसेच ...

दापोरा ता.जळगाव : दापोरा येथील गट नं. २१० मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या मालकीचे क्षेत्र आहे. त्यातील मुरुमाचे, तसेच दगडाचेही अवैधरीत्या उत्खनन सुरू आहे, यामुळे परिसरात अनेक मोठ्या खदानी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यावर महसूल प्रशासनाने नियंत्रण आणावे, अशी मागणी होत आहे. दापोरा हद्दीत सुरू असलेल्या अवैध उत्खननामुळे मोठा महसूल बुडत असून, ग्रामपंचायतीलाही कोणतेही उत्पन्न नाही. तरीही हे अवैध उत्खनन कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दापोरा गावठाण हद्दीत सुरू असलेल्या मुरुम व दगडाच्या अवैध उत्खननासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन काही वेळा परवानगी घेतली जाते. मात्र, बऱ्याच वेळा कोणताही परवाना नसताना उत्खनन सुरू असते. यावर मागील आठवड्यात झालेल्या ग्रामसभेत उत्खनन बंद करण्याविषयी ठराव करावा, अशी मागणी झाली. मात्र, पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी टाळत पूर्वीपासूनच उत्खनन सुरू असल्याचे सांगत वेळ मारून नेली. हे अवैध उत्खनन केव्हा बंद होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट –

दापोरा हद्दीत अनेक मुरुम व दगडाच्या उत्खननामुळे खदानी तयार झाल्या आहेत. यापासून ग्रामपंचायतीस कोणतेही उत्पन्न नाही, तरीही यास कोणाचा आशीर्वाद आहे, यासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव दिला असेल, तर तो रद्द करण्यासाठी ग्रामसभेत चर्चा करण्यात येईल.

– मगलसिंग सोनवणे, ग्रा.पं. सदस्य, दापोरा.

फोटो कॅप्शन-

दापोरा येथील अवैध मुरुम व दगडाचे अशा प्रकारे उत्खनन केले जात असून, मोठ्या खदानी निर्माण झाल्या आहेत.