शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 23:37 IST

भरधाव वेगाने जाणारा गुरांचा ट्रक पोलिसांना माहिती मिळताच पकडला.

ठळक मुद्देफैजपूर पोलिसांची कारवाई१८ गुरांची जिवंत सुटका

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : भरधाव वेगाने जाणारा गुरांचा ट्रक शहरातील सुभाष चौकात पोलिसांना माहिती मिळताच पकडला. यातील ट्रक चालक हा ट्रक सोडून फरार झाला आहे. पोलिसांनी गुरांचा ट्रक वडोढा येथील आश्रमात रवाना केला. त्यात दोन गुरे मयत तर १८ कोंबलेल्या स्थितीत जिवंत आढळून आली.रावेरकडून भरधाव वेगाने अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच या ट्रकला रावेर व सावदा येथेसुद्धा अडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र ट्रक भरधाव असल्याने तो हाती लागला नाही. मात्र फैजपूर पोलिसांना याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे व सहका-यांनी सदरचा ट्रक हा सुभाष चौकात अडविला. ट्रक पकडताच चालक हा फरार झाला. पोलिसांनी तातडीने हा ट्रक वडोढा येथील आश्रमात रवाना केला व यातील गुरांची सुटका केली. त्यात दोन गुरे ही मयत झाली होती तर १८ ही कोंबलेल्या स्थितीत जिवंत आढळून आली. याबाबत रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारFaizpurफैजपूर