शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

झाडांचे संगोपन केल्यास घरपट्टी माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:23 IST

वसंतनगर ग्रामपंचायतीचा उपक्रम : ‘एक घर एक झाड’, ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद

अमळनेर : पारोळा : वसंतनगर, ता.पारोळा येथे ग्रामपंचायतीमार्फत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘एक घर, एक झाड’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जे कुटुंब वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करेल त्याला वार्षिक कर म्हणजे घरपट्टी व पाणीपट्टी माफ केली जाईल, अशी घोषणा पंचायत समिती माजी सभापती प्रकाश जाधव व गावचे सरपंच अविनाश जाधव यांनी केली.वसंतराव नाईक यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त सदर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक कुटुंबात एक झाड देण्यात आले. प्रत्येकाने ते शेतात किंवा घराच्या परिसरात लावून त्याचे संगोपन करावयाचे आहे. वर्षभरात ज्यांनी झाडे जगविली अशा कुटुंबांना वर्षभरातील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे एक हजार १८७ झाडे ग्रामपंचायतीकडून वाटप करण्यात येणार आहेत.यावेळी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती प्रकाश देशमुख जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच अविनाश जाधव, अजमल जाधव, गणेश जाधव, आवेराम जाधव, ताराचंद जाधव, गोरख जाधव, राजाराम जाधव, संतोष जाधव, शालिक जाधव, अनार जाधव, दीपक जाधव, एकनाथ जाधव, स्रोहिदास जाधव, सरीचंद जाधव, श्याम जाधव, रमेश जाधव, विलास जाधव, मनोज जाधव, हिरा जाधव, हुकूम जाधव, साहेबराव जाधव, दरबार जाधव, बाळू जाधव, मधुकर जाधव, जगन जाधव, मोकम जाधव, विठ्ठल जाधव, सुभाष जाधव, आलम जाधव, मोती जाधव, बाबूलाल जाधव आदी उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे कमी होत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. झाडे जगली तर पर्यावरणाचे संतुलन राखले जाऊन पर्जन्यमानातही बदल जाणवेल. त्यामुळे झाडे नुसती लावून उपयोग नाही तर ती जगविली पहिजेत. या उद्देशाने हा उपक्रम राबवीत आहोत, असे सरपंच, ग्रामस्थांनी सांगितले.