शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वनजमिन विक्री प्रकरणात गरज पडल्यास स्वत: फिर्याद देऊ- आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 22:38 IST

विधानसभेतही उपस्थित करणार विषय

जळगाव: वनजमीनीची परस्पर बनावट सातबाराच्या आधारे विक्री केल्याच्या प्रकरणात प्रशासन फिर्याद देणार आहे. त्यांनी तक्रार न दिल्यास स्वत: तक्रार देऊ, अशी माहिती आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवार व परिसरातील वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले असून आतापर्यंत सुमारे २२८८ एकर जमिनची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. शेकडो कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रा.चंद्रकांत स ोनवणे यांनी रविवार, ७ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. याबाबतचे निवेदन सोमवार, ८ आॅक्टोबर रोजी जळगाव दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनाही सादर केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. त्या अहवालात काय शिफारस केली जाते? जिल्हाधिकारी काय आदेश देतात? यानंतर या विषयी विधानसभेत हा मुद्दा उचलू. प्रशासन याबाबत तक्रार करणार असल्याचे समजले. त्यांनी तक्रार दिली नाही तर मी स्वत: तक्रार देईल, असे आमदार सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आमदार सोनवणे म्हणाले की, वनजमिनीची खरेदी-विक्री झाली आहे. त्याचे खरेदी खतच प्रशासनाच्या हाती लागले आहेत. त्यामुळे लोकांना फसविण्याचा उद्देश होता, हे स्पष्ट आहे. त्यानुसार व्यवहारही झाले आहेत त्यामुळे हा मुद्दा विधानसभेत उचलला जाईल.