शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तर लोकप्रतिनिधी आता गप्प का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:36 IST

शिवाजीनगर उड्डाणपूल

सचिन देवजळगाव : शिवाजीनगर उड्डाणपूल १५ दिवसांपासून बंद झाल्यामुळे, गेल्या आाठवड्यात अग्नीशामक बंब वेळीच न पोहचल्यामुळे अनेक गरिबांचे संसार आगीत खाक झाले तर दोन दिवसांपूर्वी वेळीच उपचार न मिळाल्यामुळे एका बालकाला आपले जीव गमवावा लागला. लागोपाठ या आठवड्यांत शिवाजीनगरत या दोन गंभीर घटना घडुनही, प्रशासनासह लोकप्रतिनिधी या घटनांवर साधा शोक व्यक्त करतांना दिसून आले नाही.अनेकवेळा सामाजिक प्रश्नासाठी महासभेत आवाज उठवणारे, पुढे-पुढे करणारे लोकप्रतिनिधी आता गप्पा का ? असा प्रशन सर्व सामान्य जळगावकरांतर्फे उपस्थित करण्यात येत आहे.जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यांत या उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करुन, पूलाच्या कामाला सुरुवात केली आहे. यामुळे पूलावरील वाहतुक सुरत गेट मार्गे वाहतुक वळविण्यात आल्याने नागरिकांना दररोज १० किलोमीटरचा फेरा पडत आहे.या फेऱ्यातुन प्रवासा करतांना रस्त्यावरील वाहतुक कोंडी व गेट मध्ये वाहन अडकल्यावर होणाऱ्या विलंबामुळे जळगावकरांना चांगलाच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.दररोज या ठिकाणाहुन शिवाजीनगरातील रहिवाशांसह परिसरातील गावांमधुन सुमारे १० हजार वाहनधारक ये-जा करित असतात. सुरत गेट हा एकच पर्यायी मार्ग असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तहसिल कार्यालयाजवळ पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना व आपत्कालीन परिस्थितीसाठी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. पूलाचे काम दोन वर्ष चालणार असल्याने, रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी तात्पुरते गेट उभारण्यासाठी रहिवाशांना न्यायालयाचे देखील दार ठोठावे लागले आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्त्याची मागणी फेटाळुन लावल्याने, शिवाजीनगरातील हातावर पोट भरणाºया नागरिकांना स्व:त पैसे खर्च करुन, न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. या पेक्षा आणखी दुर्देव काय म्हणावे..शिवाजीनगर वासियांचा शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाला विरोध नसुन, प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करुन द्यावा. ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जर पर्यायी रस्ता उपलब्ध झाला असता, तर ‘त्या ’आगीवर नियंत्रण मिळवता आले असते आणि ‘त्या’ बालकाचाही जीव वाचला असता. शिवाजीनगर उड्डाणपूल काहीही करुन होणारचं आहे. मात्र, त्या बालकाचा जीव परत येणार आहे का ? असे असतानांही मतासांठी मतदारांचा पाय पडणारे,त्यांना प्रलोभने दाखविणारे,ऐवढे झाल्यानंतर आवाज उठवतांना का दिसत नाहीत, आताच मौन गिळुन गप्प का..