शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

चीनने कर कमी केल्यास कापूस भाव वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 12:42 IST

आंतराष्टÑीय कॉटन असोसिएशनच्या बैठकीकडे लक्ष

ठळक मुद्दे क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांचा लाभ !

अजय पाटील जळगाव : चीनने बाहेरून येणाऱ्या कापसाच्या आयातीवर लावलेला २५ टक्के टेरीफ (कर) जर कमी केला तर त्याचा परिणाम आंतरराष्टÑीय बाजारातील कापसाच्या दरावर होण्याची शक्यता आहे. यामुळे न्युयॉर्क कॉटन असोसिएशनकडून कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यतात्याचा परिणाम भारतातील कापसाच्या दरावर होवून कापसाच्या दरात क्विंटल मागे २०० ते ३०० रुपये दराने वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती कापूस भावाचे जाणकार व जिनर्स हर्षल नारखेडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.१ फेब्रुवारी रोजी न्युयॉर्कमध्ये चीन व अमेरिकेसह आंतराष्टÑीय कॉटन असोसिएशनच्या पदाधिकाºयांची बैठक होणार आहे. या बैठकीत चीनकडून कापसाच्या आयातीवर लावण्यात आलेल्या कराबाबत चर्चा होणार आहे. अमेरिका य चीनच्या ‘ट्रेडवॉर’ मुळे दोन्ही देशांनी आपल्या देशात आयात होणाºया मालावर अतिरीक्त कर लावलेला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्टÑध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला भेट दिली होती. या दौºयावर असताना त्यांनी एकमेकांच्या मालावर लावण्यात आलेल्या करावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याच दौºयानंतर कॉटन असोसिएशनची बैठक होणार असल्याने याबैठकीकडे कापूस उद्योगातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.२०० ते ३०० रुपयांची होवू शकते वाढया बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास भावात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या कापसाचे दर ५३०० ते ५४५० इतके आहेत. दर न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने भाव वाढवल्यास भारतात देखील २०० ते ३०० रुपयांनी कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीत तोडगा न निघाल्यास भाव वाढण्याची एकमेव आशा संपुष्टात येण्याचीही शक्यता आहे. कारण आंतरराष्टÑीय बाजारात भारतीय निर्यातदारांचे दररोज सौदे रद्द होत आहेत. सूतला मागणी नाही अशा परिस्थितीत भाव वाढण्याची शक्यता कमी आहे.त्या बैठकीचा भारतावर कसा परिणामआंतरराष्टÑीय बाजारात कापसाचे दर हे न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजकडून ठरवले जातात. दरम्यान, यंदा कापूस आयातदार देशांमध्ये मुख्यत्वेकरून अमेरिकेकडून कापूस घेतला जात आहे. त्यामुळे सुरुवातीला न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने कापसाच्या दरात वाढ केली होती. मात्र, ट्रेडवॉर सुरु झाल्यानंतर चीनने अमेरिकेकडून येणाºया कापसावर २५ टक्के टेरिफ (कर) लावल्याने न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजने कापसाच्या दरात घट केली. जेणेकरून अमेरिकेच्या कॉटन निर्यातदारांना चीनने लावलेल्या करावर दिलासा मिळू शकतो.याचा परिणाम आंतरराष्टÑीय कापसाच्या भावावर झाला. त्यातच चीनने भारताकडून कापसाची आयात थांबविल्यामुळे भारतातील कापसाचे दर कमी झाले. आता चीनने अमेरिकेच्या कापसावर लावलेला कर कमी किंवा रद्द केला. तर न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजकडून पुन्हा भावात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतातील कापसाच्या दरावर देखील होण्याची शक्यता आहे.स्थानिक बाजारात व्यापाºयांकडून शेतकºयांची लुट सुरुचस्थानिक बाजारात कापसाच्या दरात घट झाली असून, आता हमीभावापेक्षा कमी दरात देखील व्यापारी शेतकºयांकडून माल घेण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने ५४५० प्रतिक्ंिवटल इतका भाव निश्चित केला आहे. मात्र, व्यापारी प्रत्यक्षात शेतकºयांकडून ५ हजार ते ५३०० दरात कापूस खरेदी करत असल्याचे दिसून येत आहेत. व हाच कापूस जिनर्स व इतर व्यापाºयांकडे जास्त भावात दिला जात आहे. हमीभावापेक्षा कमी दरात कापूस घेणाºया व्यापाºयांवर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.